आज महाशिवरात्री आहे. देशभरात हा दिवस उत्साहाने आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी शंकराचे भक्त दिवसभर उपवास करतात आणि पुजा करतात. उपवास म्हटलं नेहमी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा हे उपवास दिवशी हमखास बनवले जातात. या वेळी तुम्ही थोडा वेगळा पदार्थ बनवू शकता तो म्हणजे साबुदाणा फ्राईज. तुम्ही बटाट्याचे फ्राईज खाल्ले असतील. मीठ टाकलेले बटाटा फ्राईज उपवासाला खाऊ शकता. पण तुम्ही साबुदाणा फ्राईज देखील घरच्या घरी बनवू शकता. यासाठी तुम्हाला फार वेगळी तयारी करावी लागणार नाही. साबुदाणा वड्यासाठी जी तयारी करता तीच पुरेशी आहे. फक्त वड्याऐवजी तुम्ही त्याला फ्राईज आकार देऊ शकता. साबुदाणा वड्यापेक्षा साबुदाणा फ्राईज जास्त कुरकुरीत होतात. लहान मुलांना नक्कीच साबुदान फ्राईज खायला मज्जा येईल. यंदाच्या उपवासाला हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा.
साबुदाणा फ्राईज रेसिपी
कृती
साबुदाणा,
हिरवी मिरची
शेंगदाण्याचा कुट
मीठ
साखर
शिजवलेला बटाटा
साबुदाणा फ्राईज कृती
पाच तास साबुदाणा भिजवा
त्यात वाटलेली मिरची आणि दाण्याचा कुट टाका.
त्यात मीठ आणि साखर टाकून एकत्रित कराय
शिजवलेला बटाटा टाकून एकत्र करा
साबुदान्याचे फ्राईज आकारा द्या
गरम गराम तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या
कुरकुरीत साबुदाणाफ्राईज आस्वाद घ्या