Chutney Recipe in marathi: चटणीमुळे जेवणाचा स्वाद वाढतो. आपण सहसा शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी, चिंचेची चटणी, नारळाची चटणी, डाळीची चटणी घरी बनवतो पण तुम्ही कधी जवसाची चटणी घरी बनवली आहे का?  जर तुम्हाला घरच्या घरी जवसाची चटणी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा.आज आम्ही तुमच्यासाठी झणझणीत चटकदार अशी जवसाची चटणीची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात रेसिपी.

जवसाची चटणी बनवण्यासाठी साहित्य

How to Make A hearty breakfast of raw potato and gram flour
कच्चा बटाटा आणि बेसनचा खमंग कुरकुरीत नाश्ता, तेही फक्त १० मिनिटांत, झटपट लिहून घ्या रेसिपी
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Breakfast Recipes make this healthy aata chila recipe for sunday breakfast
Quick Breakfast Recipes : नाश्त्याला बनवा हेल्दी आटा चिला; झटपट अन् सोपी मराठी रेसिपी
Raw Banana Snacks Recipe In Marathi
Raw Banana Recipe : कच्ची केळीपासून बनवलेला हा पदार्थ कधी खाल्ला आहे का? मग रेसिपी लगेच लिहून घ्या
Olya Narlacha Paratha Recipe in marathi
रविवारी स्पेशल नाश्त्यासाठी झटपट बनवा चवदार ओल्या नारळाचे पराठे; वाचा सोपी रेसिपी
Besan Rolls Recipe in marathi
Besan Roll Recipe : बेसन रोल्स कधी खाल्ले आहेत का? मग वाचा साहित्य आणि कृती
Snacks or Starter Recipe how to make tandoori gobi tikka recipe in marathi for evening snacks or starte
अगदी सहज आणि सोपी अशी मसालेदार तंदूर फ्लॉवर रेसिपी; एकदा खाल तर खातच रहाल
latiwadi
सांगली साताऱ्याची प्रसिद्ध लाटीवडी! मैदा न टाकता झटपट बनवा पारंपारिक पदार्थ, ‘ही’ घ्या रेसिपी

२०० ग्रॅम जवसाच्या बिया

८ लाल मिरच्या

३ चमचे ऑलिव्ह ऑइल

३ चमचे जिरे

चिंच

कोथिंबीर

मीठ चवीनुसार

पाणी आवश्यकतेनुसार

जवसाची चटणी बनवण्याची पद्धत

१. जवसाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत एक चमचा तेल टाकून त्यात जवसाच्या बिया टाका आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर एका कढईत थोडे तेल घालून जिरे हलके परतून घ्यावे.

२. आता एका भांड्यात जवस, चिंच आणि जिरे घालून ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. आता या जवसाच्या पावडरमध्ये मीठ आणि मिरची मिक्स करा. नंतर पाण्याच्या साहाय्याने सर्व काही नीट मिक्स करा.

हेही वाचा >> घरीच घ्या हॉटेलसारख्या ‘ड्राय पनीर मंचूरियन’ चा आस्वाद; सोपी मराठी रेसिपी नक्की ट्राय करा

३. पुन्हा एकदा या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्याव्यात. या तयार चटणीला तेल आणि कोथिंबिरीच्या पानांनी सजवा.