Chutney Recipe in marathi: चटणीमुळे जेवणाचा स्वाद वाढतो. आपण सहसा शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी, चिंचेची चटणी, नारळाची चटणी, डाळीची चटणी घरी बनवतो पण तुम्ही कधी जवसाची चटणी घरी बनवली आहे का?  जर तुम्हाला घरच्या घरी जवसाची चटणी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा.आज आम्ही तुमच्यासाठी झणझणीत चटकदार अशी जवसाची चटणीची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात रेसिपी.

जवसाची चटणी बनवण्यासाठी साहित्य

२०० ग्रॅम जवसाच्या बिया

८ लाल मिरच्या

३ चमचे ऑलिव्ह ऑइल

३ चमचे जिरे

चिंच

कोथिंबीर

मीठ चवीनुसार

पाणी आवश्यकतेनुसार

जवसाची चटणी बनवण्याची पद्धत

१. जवसाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत एक चमचा तेल टाकून त्यात जवसाच्या बिया टाका आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर एका कढईत थोडे तेल घालून जिरे हलके परतून घ्यावे.

२. आता एका भांड्यात जवस, चिंच आणि जिरे घालून ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. आता या जवसाच्या पावडरमध्ये मीठ आणि मिरची मिक्स करा. नंतर पाण्याच्या साहाय्याने सर्व काही नीट मिक्स करा.

हेही वाचा >> घरीच घ्या हॉटेलसारख्या ‘ड्राय पनीर मंचूरियन’ चा आस्वाद; सोपी मराठी रेसिपी नक्की ट्राय करा

३. पुन्हा एकदा या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्याव्यात. या तयार चटणीला तेल आणि कोथिंबिरीच्या पानांनी सजवा.