Flower Samosa Recipe: समोसा हा असा पदार्थ आहे जो लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. सगळेच अगदी आवडीने हा खमंग पदार्थ खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. समोस्याचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. सगळ्यांनीच समोसा, पोटली समोसा असे समोस्याचे अनेक प्रकार ट्राय केले असतील. पण कधी तुम्ही फ्लॉवर समोसा खाल्ला आहे का? ही नवीन रेसिपी तुम्ही घरच्याघरी ट्राय करू शकता. कुरकुरीत, खमंग असा हा फ्लॉवर समोसा तुम्हाला बनवून पाहायचा असेल तर लगेच साहित्य आणि कृती वाचा.

साहित्य

मैदा

मीठ

२ टेबलस्पून खाद्य तेल

२ उकडलेले बटाटे

१ चिरलेला कांदा

चिरलेली हिरवी मिरची

अर्धा टेबलस्पून हळद

अर्धा टेबलस्पून गरम मसाला

कृती

१. मैदा, मीठ, २ टेबलस्पून खाद्य तेल आणि पाण्याने मऊ पीठ तयार करा.

२. बटाट्याच्या फिलिंगसाठी २ उकडलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून हळद, आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घ्या.

३. आता या पीठाची लहान पोळी तयार करा आणि त्याच्या मधोमध बटाट्याचं फिलिंग ठेवा.

४. दुसऱ्या पोळीने फिलिंग असलेली पोळी झाकून घ्या आणि काटा चमच्याच्या साहाय्याने बाजूने त्याला आकार द्या.

५. सुरीने त्याने भाग करून त्याच्या कडा पाण्याने ओल्या करा आणि फुलांचा आकार द्या.

६. कमी ते मध्यम आचेवर तळा.

७. गरमागरम टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करा. तुमच्या कुरकुरीत फ्लॉवर समोसाची रेसिपी तयारी झाली आहे.

ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.