शेफ नीलेश लिमये

साहित्य –

लेटय़ूसची १०० ग्रॅम पाने स्वच्छ धुतलेली, ५० गॅम चेरी टोमॅटो, १ उकडलेले अंडे, ५० ग्रॅम अननसाचे काप, सुरमई किंवा पापलेटचा एक भाजलेला काप, २ मोठे चमचे मेयोनिज, १ चमचा ऑलिव्ह ऑइल, चवीपुरते मीठ, मिरपूड

कृती

सर्वप्रथम लेटय़ूसची पाने एका थाळीत तळाला घालून घ्या. सुरमई किंवा पापलेटच्या कापाचे छोटे छोटे तुकडे करा. थोडय़ाशा ऑलिव्ह तेलावर चेरी टोमॅटो परतून घ्या. उकडलेल्या अंडय़ांचे पातळ काप काढा. सॅलड ज्या थाळीत देणार आहात त्यात लेटय़ूसची पाने तर आधीच घातलेली आहेत, त्यावर अंडय़ाचे पातळ काप, चेरी टोमॅटो, अननसाचे काप, सुरमईचे तुकडे ठेवा. या साऱ्यावर मेयोनिझ घाला, मीठ मिरपूड भुरभुरवा. सॅलड एकत्र करा. आता हे मस्त सॅलड खायला द्या.

nilesh@chefneel.com

Story img Loader