Corn Pancake Recipe : एखाद्या पदार्थाचे नाव बदललं की, सगळेच आवडीने खातात. तसंच काहीस पॅनकेकचं सुद्धा आहे. पॅनकेक मैदा, अंड, साखर घालून केले जातात. पण, तुम्हाला पॅनकेकमध्ये पोषण व चव दोन्ही हवं असेल तर वेगवेगळी फळे, सिरप, जॅम, भाज्या घालून पण पॅनकेक बनवू शकता. म्हणजेच मूल आवडीने खाणाऱ्या पॅनकेकमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून त्यांना व्हिजिटेबल पॅनकेक तयार करून देऊ शकतो. तर आज आम्ही तुम्हाला ‘मक्याचे पॅनकेक’ (Corn Pancake) कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर लगेच साहित्य व कृती लिहून घ्या.

साहित्य :

१. एक कप उकडलेले मक्याचे दाणे
२. १/४ कप चिरलेला कांदा
३. १/४ कप किसलेले गाजर
४. १/४ कप चिरलेली सिमला मिरची
५. चिरलेली कोथिंबीर
६. दोन चमचे मक्याचे पीठ
७. दोन चमचे मैदा
८. १/२ चमचा चिली फ्लेक्स व ओरेगॅनो
९. किसलेले चीज

tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Diwali Faral Recipe Shankarpale
Diwali Faral Recipe : तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत बिस्किट शंकरपाळी! जाणून घ्या सोपी रेसिपी
Bhakri chaat recipe Video
आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा
momos dumplings different from one another
मोमोज, डिम सम आणि डंपलिंगमध्ये नेमका काय फरक असतो?
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
How to make fruit cream recipe for fasting fruit cream recipe in marathi
मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रूट क्रीम रेसिपी; उपवासालाही बेस्ट रेसिपी
instant rice thalipeeth
झटपट होणारे तांदळाचे थालीपीठ नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती..

हेही वाचा…Oats Ladoo: सकाळच्या, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक ‘ओट्सचा लाडू’ खा; चव अन् पोषण दोन्ही मिळेल; रेसिपी लिहून घ्या लगेच

कृती :

१. एका बाउलमध्ये उकडलेले मक्याचे दाणे, कांदा, सिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, मैदा, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, मक्याचे पीठ, चीज आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
२. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवा आणि हे मिश्रण गोलाकार पद्धतीने पॅनवर पसरवून घ्या.
३. नंतर पॅनकेक एकाबाजूला खरपूस भाजून घ्या.
४. अशाप्रकारे तुमचे ‘मक्याचे पॅनकेक’ (Corn Pancake) तयार.

सोशल मीडियाच्या या @bornhungrybypayal इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही आतापर्यंत मक्याचे कटलेट, मक्याचे सूप, मक्याची भेळ, मक्याचे पकोडे आदी अनेक पदार्थ खाल्ले असतील. तर आज मक्याचे पॅनकेक सुद्धा बनवून पाहा आणि लहान मुलांच्या डब्यामध्ये द्या.

मका खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

पिवळ्या रंगाच्या मक्यात ‘अ‍ॅन्टिऑक्सिडंट’चे प्रमाण असते. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही अ‍ॅन्टिऑक्सिडंट फायदेशीर ठरतात. याशिवाय मक्याच्या दाण्यांमध्ये न विरघळणाऱ्या तंतुमय पदार्थही असतात.मक्याच्या एका कणसात ६ ते ८ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. मक्यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसतत्त्व तर आहेच, पण मॅग्नेशियम आणि पोटॅशियमदेखील मक्यातून मिळते.