Nachani Thalipeeth: हिवाळ्याच्या दिवसात अनेक घरांमध्ये नाचणी, बाजरीच्या भाकरीचे आवर्जून सेवन केले जाते. आज आम्ही तुम्हाला नाचणी आणि बाजरीचे पौष्टिक थालीपीठ कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या नाचणी आणि बाजरीच्या थालीपीठची रेसिपी
नाचणीचे पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ वाटी नाचणीचे पीठ
- १/२ वाटी बाजरीचे पीठ
- १/२ वाटी बेसन
- २ चमचे लाल तिखट
- मीठ चवीनुसार
- १ बारीक चिरलेला कांदा
- १ वाटी गाजर
- १ वाटी बीट
- १/२ वाटी कोथिंबीर
- तूप आवश्यकतेनुसार
नाचणीचे पौष्टिक थालीपीठ बनवण्याची कृती:
हेही वाचा: तीन कप पीठापासून बनवा नाचणीचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी
- सर्वप्रथम एका परातीत नाचणीचे, बाजरीचे पीठ आणि बेसन एकत्र करून त्यात कांदा, किसलेले गाजर, बीट, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ एकजीव करा.
- या मिश्रणात लागेल तसे पाणी घालून त्याचे घट्ट पीठ मळून घ्या.
- आता या तयार पीठाचे लहान-लहान गोळे करून थालीपीठ थापून घ्या.
- तयार थालीपीठ गरम तव्यावर टाकून तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
- तयार गरमागरम नाचणी थालीपीठ दह्याबरोबर सर्व्ह करा.