महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात विविध खाद्यपदार्थ आहे पण सर्वांचा आवडता असा पारंपारिक खाद्यपदार्थ म्हणजे. पुरणपोळी. साजूक तूप लावलेली, टम्म फुगलेली, गरम गरम पुरणपोळी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. महाराष्ट्रात सणासुदीच्या दिवशी पुरणपोळी हमखास बनवली जाते. नुकताच होळी सण पार पडला. होळीचा सण पुरणाच्या पोळीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. होळीला पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो पण तुम्हाला माहीत आहे का पुरणपोळीचे इतरही अनेक प्रकार आहेत जे तुम्हाला आवडू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या…

पुरणपोळीचे प्रकार (Types of Puranpoli)

पारंपारिक पुरणपोळी (Traditional puranpoli)

पारंपारिक पुरणपोळी ही सहसा गव्हाच्या पिठापासून तयार करतात ज्यामध्ये हरभरा डाळ आणि गूळ वापरून तयार केलेले पूरण हे सारणा म्हणून वापरले जाते. हलक्या हाताने ही पोळी लाटली जाते आणि गरमा गरम पोळी साजूक तूप घालून केली जाते.

साखरेची पुरणपोळी (Sugar puranpoli)

पारंपारिक पुरणपोळीमध्ये फक्त गुळच सारण म्हणून वापरला जातो काहींना गूळ आवडत नाही त्यामुळे त्याचे गूळाऐवजी साखर वापरतात. यासह यामध्ये किंचीत हळद वापरतात जेणेकरून पोळीला पिवळा रंग यावा.

साखर गुळाची पुरणपोळी (Sugar jaggery puranpoli)

काही जण साखर आणि गूळ वापरलेली पोळी खायला आवडते. अनेकदा गूळ आणि साखर सम प्रमाणात वापरून पुरणपोळी बनवली जाते.

खापरावरची पुरणपोळी (Khaparavarchi Puranpoli)

खापरावरची पुरणपोळी ही खाणदेशातील प्रसिद्ध पुरणपोळी आहे. ही पोळी विशिष्ट आणि पारंपारिक पद्धतीने तयार केली जाते. ही पोळी खास मातीच्या खापरावर (मडक्यावर) केली जाते. ही पोळी सामन्य पोळीपेक्षा मोठी असते .ही पोळी लांब करण्यासाठी दोन्ही हातांवर पोळी टाकतात आणि विशिष्टपद्धतीने हात फिरवून पोळी मोठी केली जाते. या पोळीला मांडा असे म्हटले जाते.

कोल्हापूरी तेलपोळी (पुरणपोळी) Kolhapuri Telpoli (Puranpoli)

ही पुरणपोळी मैदा न वापरता तेल गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. ही पोळीसाठी लाटताना पोळपाटावर प्लास्टिक कागद ठेवून त्याला तेल लावले जाते. पोळी लाटण्यासाठी पीठ न वापरता तेल वापरतात.

विदर्भातील पुरणपोळी (Puranpoli from Vidarbha)

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी पोळी बनवली जाते. विदर्भातील पुरणपोळी देखील प्रसिद्ध आहे. विदर्भात साखर घालून पुरण केले जाते पण पोळी लाटताना पातळ न लाटता जाडसर लाटली जाते.

सत्तूची पुरणपोळी (Sattu Puranpoli)

अनेक लोक आरोग्याची काळजी घेतात ज्यामुळे पारंपारिक पद्धतीने बनवली जाणारी पुरपोळी खाणे टाळतात. या लोकांना पुरणपोळी खाण्याची इच्छा असते पण इच्छा असूनही खाता येत नाही. अशा लोक सत्तूची पुरणपोळी खाऊ शकतात. या मध्ये गव्हाच्या पिठाऐवजी सत्तूचे पीळ कणकेसाठी वापरतात.

मूगडाळीची पुरणपोळी (Moongdal Puranpoli)

हरभरा डाळाची पुरणपोळी पचायला जड असते त्यामुळे अनेक लोक हरभरा डाळीऐवजी मुगाच्या डाळीचे पुरण करतात. ही पोळी देखील चवीला उत्तम असते.

ड्रायफ्रूट्स पुरणपोळी (Dryfruits Puranpoli)

पुरणपोळी आणखी पौष्टिक बनवण्यासाठी तर तुम्ही त्यात काजू, बदाम, खारीक अशा सुक्या मेव्याची पूड तयार करून पुरणामध्ये टाकतात.

खव्याची पुरणपोळी (Khava Poli)

अनेक लोकांना पारंपारिक डाळीच्या पुरणाऐवजी खव्याची पुरणाची पोळी खायला आवडते. ही पोळी तयार करताना मैद्यापासून बनवली जाते आणि पुरणाचे सारण म्हणून खवा वापरला जातो. सणासुदीला ही पोळी आवर्जून बनवली जाते.