Gajar Burfi Recipe:  हिवाळ्यामध्ये गाजरं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. साधारणतः गाजरचा हलवा केला जातो. तर अनेकदा त्याचा कोशिंबीरमध्ये समावेश केला जातो. परंतु, आज आपण गाजरापासून बनवली जाणारी बर्फी ट्राय करणार आहोत. गाजरचा हलवा खाऊन तुम्ही नक्कीच कंटाळला असाल म्हणूनच आज आपण ‘गाजर बर्फी’ची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

1/2 किलो किसलेले गाजर

1 कप साखर

1 कप दूध

1/2 कप बारीक रवा

1/2 कप मिल्क पावडर

1/2 चमचा वेलची पूड

सुक्यामेव्याचे काप आवडीनुसार

तूप

हेही वाचा… नवीन वर्षाच्या आधी बटाट्याचा ‘हा’ पदार्थ नक्कीच करून पाहा, चव कायम राहेल लक्षात!

कृती

१. प्रथम गाजर स्वच्छ धुवुन साले काढुन घ्या. कढईत रवा तूप न वापरता मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या व प्लेट मध्ये काढून घ्या.

२. सर्व गाजर किसून घ्या. मिक्सर जार मधून जाडसर वाटून घ्या.

३. कढईत तीन,चार चमचे तूप गरम करुन त्यात गाजराचा किस घाला. याला छान सात, आठ मिनिटे परतून छान वाफ येऊ द्या. आता यामध्ये दूध घालुन, पूर्ण दूध आटेपर्यंत शिजू द्या.

४. यात नंतर साखर घाला. साखर विरघळली की त्यात रवा, मिल्क पावडर घालून मिक्स करा व झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवून सर्व एकत्र चांगले शिजू द्या. छान घट्ट होऊ द्या. शेवटी वेलची पूड घाला.

५. आता एका ताटाला किंवा टिनला तुपाने ग्रिसींग करुन हे मिश्रण त्यावर थापून घ्या. त्यावर सुक्या मेव्याचे काप पसरवा आणि थंड झाल्यावर आवडेल त्या आकाराच्या वड्या करून घ्या. बर्फी तयार.

६. मस्त गाजर बर्फी खाण्यासाठी तयार आहे.

*ही रेसिपी कूकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.

Story img Loader