Gajar Rabdi Recipe: हिवाळ्यामध्ये गाजरं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. साधारणतः गाजरचा हलवा केला जातो. तर अनेकदा त्याचा कोशिंबीरमध्ये समावेश केला जातो. परंतु, आज आपण गाजरापासून बनवली जाणारी एक स्वीट डिश ट्राय करणार आहोत. गाजरचा हलवा खाऊन तुम्ही नक्कीच कंटाळला असाल म्हणूनच आज आपण ‘गाजर रबडी’ची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
अर्धा किलो किसलेले लाल गाजर
२ चमचे तूप
वेलची, काजू, बदाम व इतर ड्रायफ्रुट्स
१ लीटर क्रीम दूध
तांदूळ
चमचा वेलची पूड
अर्धा कप साखर
हेही वाचा… या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
कृती
- अर्धा किलो किसलेले लाल गाजर घ्या.
- एका पातेल्यात २ चमचे तूप घाला.
- वेलची, काजू, बदाम व इतर ड्रायफ्रुट्स भाजा.
- त्यात किसलेले गाजर घालून ५ मिनिटे भाजा.
- १ लीटर पूर्ण क्रीम दूध घाला आणि ५ मिनिटे शिजवा.
- तांदूळ अर्धा तास भिजवून मिक्सरमध्ये ठेचून घ्या.
- मिक्स केलेला तांदूळ घालून १५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
- १ चमचा वेलची पूड आणि अर्धा कप साखर घाला.
- ५ मिनिटे शिजवा.
- ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करा आणि मजा घ्या.
हेही वाचा… १५ मिनिटांत ‘कैरीचं लोणचं’ बनवायचंय? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, लगेच वाचा साहित्य आणि कृती
पाहा VIDEO
ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.