Ganeshotsav Special Ukadiche Modak: गणेश चतुर्थीला घराघरात आणि मंडळांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमण होणार आहे. यानिमित्ताने घरोघरी साफ-सफाई आणि सजावटीसाठी लगबग सुरु झाली आहे. यानिमित्ताने आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. गणेश चतुर्थीला गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर मऊसूत आणि चविष्ठ उकडीच्या मोदकांचा नवैद्य दिला जातो. यामुळे अनेक घरात उकडीचे मोदक बनवण्याचा घाट घातला जातो. अनेकजण साच्याने किंवा हाताने कळ्या पाडून मोदक तयार करतात. पण कळ्या पाडून तयार केलेले मोदक दिसायलाही खूप सुरेख दिसतात. पण सर्वांना मोदकाच्या कळ्या करणं जमत नाही, अनेकदा कळ्या करताना मोदकाची पारी फाटके किंवा त्यांचा आकार नीट येत नाही. अशावेळी कळ्या चांगल्या बनवण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहोत जी फॉलो करुन तुम्ही कळ्या असलेले सुंदर उकडीचे मोदक करु शकता, यासाठी तुम्हाला एका छोट्या चमच्याची गरज लागणार आहे. चला मग जाणून घेऊ ही ट्रिक….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उकडीचे मोदक बनवताना त्याच्या कळ्या अनेकदा नीट पडत नाही, तर त्यासाठी Savita’s recipe and blogs या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे, ज्यात उडकीच्या मोदकाला चमच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने कशा कळा पाडायच्या ते दाखवण्यात आले आहे.

उकडीच्या मोदकाला कळ्या पाडण्याची सोप्पी ट्रिक

१) उकडलेल्या तांदळाच्या पिठाचा गोळा करुन चांगला मळून घ्या. यानंतर हाताला थोडे पीठ किंवा तेल लावून त्याला पूरीसारखा पण खोलगड आकार द्या.

२) आता त्या पुरीमध्ये मोदकासाठी गुळ, खोबरे, इलायची, ड्रायफ्रूट्सपासून बनवलेले सारण चमचाने व्यवस्थित भरा.

३) यानंतर पुरी सर्व बाजूने पूर्ण बंद करुन घ्या. आणि त्याला मोदकाचा आकार द्या.

४) यानंतर चमचाच्या साहाय्याने मोदकावर ठरावीक अंतरावर खाचा करुन कळ्या पाडा.

५) यानंतर चाळणीवर किंवा मोदक पात्रात हे मोदक ठेवून १५ मिनिटे वाफवून घ्या. यानंतर तयार मोदकांवर साजूक तूप घालून बाप्प्ला नैवेद्य ठेवा.

अशाप्रकारे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मोदकाच्या कळ्या तयार करु शकता. यामुळे मोदक दिसायलाही सुंदर दिसतील.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2023 how to make perfect ukadiche modak recipe in marathi sjr
Show comments