Khajur ladoo recipe: दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी होणार असून, त्याची बाजारपेठा, सार्वजनिक मंडळं आणि घरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. दहा दिवसांचा गणेश उत्सव गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. या उत्सवात विविध प्रकारचे पदार्थ बनवून गणपतीला अर्पण केले जातात. अशात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीसाठी खास पदार्थ बनवू शकता. यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. चला तर आज पाहुयात खजूर लाडू कसे तयार करायचे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खजूर लाडू साहित्य

  • २५ खजूर बिया काढून
  • अर्धी वाटी बदाम भरडसर वाटून
  • १/२ कप किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून
  • १ टेस्पून तूप
  • १ टीस्पून खसखस
  • वेलदोड्याची पूड
  • बदाम, मनुका, काजू, पिस्ता

खजूर लाडू कृती –

  • खजुराचे लाडू बनवण्याआधी खजूर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. नंतर खजुर बारीक करून एका भांड्यात अलगद ठेवा. यानंतर कढईत तूप टाकून वितळवून घ्या.
  • नंतर त्यात नारळ आणि सर्व ड्रायफ्रुट्स घालून साधारण 1-2 मिनिटे परतून घ्या. यानंतर हे भाजलेले ड्रायफ्रुट्स प्लेटमध्ये काढा. मग या कढईत एकदा तूप टाकून वितळवून घ्या. यानंतर त्यात पीठ घालून ते ब्राऊन होईपर्यंत चांगले परतून घ्या.
  • नंतर एका मोठ्या भांड्यात या सर्व गोष्टी एकत्र करून नीट मिक्स करा. यानंतर हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यातून मध्यम आकाराचे लाडू बनवा.

हेही वाचा >> बाप्पाच्या प्रसादासाठी गोड बुंदी घरीच बनवा, १० मिनिटांत गोड रसरशीत बुंदी, जाणून घ्या सोपी रेसिपी

  • वळताना हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावावे. आता तुमचे उर्जेने भरलेले खजूर लाडू तयार आहेत.

खजूर हे एक अतिशय शक्तिशाली ड्रायफ्रूट आहे जे कार्बोहायड्रेट्स, लोह, फायदेशीर चरबी, आहारातील फायबर, फॅटी ऍसिडस्, कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रथिने यांसारख्या गुणधर्मांचे भांडार आहे.