Ganpati Naivedya Recipes: लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले. १० दिवस गणेशाला कोणता प्रसाद अर्पण करायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, घरातले काही पदार्थ सुद्धा वापरून सोपा प्रसाद म्हणून करू शकता.गणेशोत्सव हा १० दिवसापर्यंत चालणारा प्रसिद्ध सण आहे. गणेशोत्सवात भक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी दररोज नवनवे प्रसाद तयार करतात. जाणून घ्या गणेशोत्सवात बाप्पाला आवडणारा प्रसाद कोणता ते.तुम्हीही घरी गणपती बसवत असाल तर त्याला दहा दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवावेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदक : मोदक हे गणपतीचे सर्वात आवडते खाद्य आहे. पहिल्या दिवशी तांदळाचे पीठ, नारळ आणि गुळापासून बनवलेले पारंपरिक मोदक देवाला अर्पण केले जातात. मोदक अनेक प्रकारे बनवले जात असले तरी नारळ आणि गुळाचे मोदक हा त्यांचा आवडता भोग आहे.

मोतीचूर लाडू: मोतीचूर लाडू हे देवाचे दुसरे आवडते खाद्य आहे. हे लाडू त्यांना तसेच त्यांचे वाहन मुष्कराज यांनाही प्रिय आहेत. दुस-या दिवशी शुध्द तुपापासून बनवलेले हे लाडू देवाला अर्पण करावे.

गुळाचे लाडू: जेव्हा कुबेराने गणेशाला जेवणासाठी आमंत्रित केले तेव्हा गणपतीचे काही केल्या पोट भरेना त्यांना अधिक खाण्याची इच्छा होतच राहीले. तेव्हा असे मानले जात होते की भगवान शिवाने त्यांना भक्तीने काही फुगलेले तांदूळ अर्पण केले. असा विश्वास आहे की त्यानंतरच गणेशाची भूक भागली. म्हणूनच गणेश उत्सवात मुरमुरा आणि गुळाचे लाडू तयार केले जातात आणि श्रीगणेशाला नैवद्य म्हणून अर्पण केले जातात.

नारळाचा भात : गणपतीला नारळाचा भातही खूप आवडतो आणि तिसर्‍या दिवशी त्यांच्या पूजेच्या वेळी तो अर्पण करावा. नारळाच्या दुधात भात शिजवून हा भोग तयार केला जातो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात गूळ किंवा साखरही घालू शकता.

केळीचा शिरा : पिकलेली केळी मॅश करून त्यात रवा आणि साखर मिसळून शिरा बनवला जातो. तुमची इच्छा असेल तर या ऐवजी तुम्ही शुद्ध तुपात बनवलेला हलवाही देवाला अर्पण करू शकता. हे सहाव्या दिवशी देवाला अर्पण करावे.

खीर: हे एकंदर सर्वच देवतांचे आवडते अन्न असल्याचे मानले जाते आणि यामुळेच खीर हा प्रत्येक भारतीय सणांचा भाग असते. गणपती उत्सवाच्या निमित्ताने दुधासह अनेक प्रकारच्या खीर घरोघरी बनवल्या जातात.

छप्पन भोग: दहाव्या दिवशी गणपतीच्या आवडीचे सर्व भोग तयार करा. या प्रसादाची संख्या ५६ प्रकारची असावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात कोणताही भोग बनवू शकता. या दिवशी गणपतीला शुद्ध व सात्विक भोजनाचा विशेष भोग अर्पण केला जातो.

पुरण पोळी : हरभरा डाळ आणि गूळ घालून केलेली पुरण पोळी हा गणपतीचा प्रसाद आहे. चौथ्या दिवशी हा नैवेद्य देवाला अर्पण करावा. गणपती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल.

श्रीखंड : श्रीखंड हा श्रीगणेशाच्या पूजेमध्ये सर्वात आवडता नैवेद्य मानला जातो. हे केशर दही आणि साखर आणि विविध प्रकारच्या ड्रायफ्रुट्समध्ये मिसळून बनवले जाते. तुमची इच्छा असेल तर श्रीखंडाव्यतिरिक्त तुम्ही पाचव्या दिवशी पंचामृत किंवा पंजरी देखील अर्पण करू शकता.

हेही वाचा >> Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू

शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा: गणपतीला शुद्ध तुपात शिजवलेला गूळ खूप आवडतो. त्यामुळे नवव्या दिवशी तुम्ही हे गणपतीला अर्पण करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या गुळात खजूर आणि खोबरेही घालू शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2024 bhog for ganpati bappa naivedya recipes in marathi srk