Ganpati Naivedya Recipes: गणेशोत्सव हा सण जल्लोशाचे,चैतन्याचे आणि ऊत्साहाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात तर हा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरोघरी फुलांची आरास सजलेली असते. धूप-दीपांचा सुगंध दारोदारी दरवळत असतो. यावेळी बाप्पासाठी नैवेद्य, प्रसाद बनवला जातो. आज आम्ही तुम्हाला प्रसादासाठी रव्याची बर्फी कशी करायची हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रव्याची मऊसूत बर्फी साहित्य –

वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी
रवा
तूप
साखर
पाणी
सुकं खोबरं
वेलची पूड

रव्याची मऊसूत बर्फी कृती –

सर्वप्रथम, कढईत ३ चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात एक वाटी रवा घालून भाजून घ्या.

रवा खरपूस भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर कढईत एक वाटी साखर घाला.

नंतर ग्लासभर पाणी घाला. पाण्यात साखर विरघळल्यानंतर त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करा.

नंतर त्यात एक कप किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून चमच्याने मिक्स करा.

मिक्स करून झाल्यानंतर, एका ताटाला चमचाभर तूप लावून ग्रीस करा. व त्यात तयार मिश्रण घालून पसरवा.

त्यावर चिरलेला सुका मेवा घालून गार्निश करा. मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीने वड्या कापून घ्या.

हेही वाचा >> बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा? तुम्हालाही हा प्रश्न असेल तर, जाणून घ्या बाप्पाचे आवडते १० पदार्थ

अशा प्रकारे चविष्ट रवा बर्फी खाण्यासाठी रेडी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati naivedya recipes how to make semolina barfi ravyachi barfi prasad recipe ganesh ustav special dessert srk