Garlic Potato Recipe : हॉटेलमध्ये आपण आवडीने गार्लिक पोटॅटो खातो पण तुम्ही कधी घरी बनवून गार्लिक पोटॅटोचा आस्वाद घेतला आहे का? गार्लिक पोटॅटो घरी बनवणे खूप सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडणारे गार्लिक पोटॅटो घरच्या घरी कसे बनवतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • बटाटे
  • तेल
  • लाल मिरचीचे पावडर
  • तूप
  • कोथिंबीर
  • आले

हेही वाचा : French Fries : घरीच बनवा हॉटेलसारखे कुरकुरीत फ्रेंज फ्राइज, ही सोपी रेसिपी फॉलो करा

कृती

  • बटाटे घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या
  • त्यानंतर बटाटे सोलून घ्या
  • त्यानंतर बटाट्याच्या जाडसर गोल चकत्या पाडा.
  • कढई गरम करा. त्यात थोड्या प्रमाणात तेल टाका
  • तेल गरम झाले की बटाट्याच्या चकत्या त्यात टाका आणि सात ते आठ मिनिटे त्यावर प्लेट झाकून ठेवा आणि कमी आचेवर शिजू द्या
  • त्यानंतर त्या चकत्या दुसऱ्या बाजूने पाच ते सहा मिनिटे त्यावर प्लेट झाकून ठेवा आणि शिजू द्या.
  • बारीक केलेले लाल मिरचीचे पावडर आणि बारीक केलेले आलं त्यावर टाका.
  • त्यावर थोड तूप टाका आणि चांगले परतून घ्या
  • शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garlic potato recipe how to make garlic potato chips at home food lovers food recipe new ndj