Garlic Vegetable Soup recipe in marathi: हिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सर्दी खोकला किंवा ताप आल्यानंतर काहीच खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. आजारपणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. अशावेळी शरीराला पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गार्लिक व्हेजीटेबल सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
गार्लिक व्हेजीटेबल सूप साहित्य
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- २ चमचे ऑलिव्ह तेल
- १ मोठा कांदा, बारीक चिरलेला
- ४-५ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
- १ इंच आले, किसलेले
- २ गाजर, बारीक चिरून
- १ सिमला मिरची, बारीक चिरून
- १ कप ब्रोकोली
- १ कप मटार
- १/२ टीस्पून मीठ
- १/४ टीस्पून काळी मिरी
- कोथिंबीर बारीक चिरलेली
गार्लिक व्हेजीटेबल सूप कृती
- गार्लिक व्हेजीटेबल सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्या
- यानंतर एका मोठ्या सॉसपॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करा
- त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता
- आता कांदा सोनेरी झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण आणि आले घालून 30 सेकंद परतून घ्या
- आता त्यात गाजर, सिमला मिरची, ब्रोकोली आणि मटार घालून मिक्स करा
- यानंतर, भाजी परतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला
- पॅनवर झाकण ठेवून मध्यम आचेवर १५-२० मिनिटे शिजवून घ्या
हेही वाचा >> सकाळी लवकर उठून डबा बनवायचा कंटाळा आला तर एक दिवस आधी बनवा सँडविच; सोबतच या टिप्स फॉलो करा स्वयंपाक होईल सुपरफास्ट
- शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
- तयार सूप एका वाटीत काढून ताज्या कोथिंबिरीने सजवा आणि गरमा गरम सर्व्ह करा