Gatari 2024 Special Non- veg Recipe: श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती ‘आषाढी अमावस्या’ ज्याला अलीकडे ‘गटारी अमावस्या’ असे ही म्हटले जाते. या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात आणि त्यावर ताव मारला जातो. कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही. यंदा ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.

गटारीच्या दिवशी नॉनव्हेज प्रेमी चिकन, मटण, फिशवर मनसोक्त ताव मारतात. कारण त्यानंतर त्यांना महिनाभर नॉनव्हेज खायला मिळणार नसते. महाराष्ट्रात ही गटारी साजरी केली जाते. या दिवशी अनेक घरांमध्ये हमखास चिकन, मटणाचा बेत असतोच. तुम्हीही जर गटारीचा बेत आखत असाल तर या गटारीला या रेसिपी नक्की ट्राय करा.

Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
How To make Leftover rice cutlet
Leftover Rice Recipe : रात्री उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! मोजकं साहित्य वापरून करा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ

अमृतसरी चिकन मसाला साहित्य

१ किलो चिकन

१ टीस्पून आले लसूण पेस्ट, १ टीस्पून कसुरी मेथी

१ टीस्पून धने पावडर

१ टीस्पून डेगी लाल मिरची पावडर

१/२ टीस्पून हळद, २ चमचे तूप

२ टेबलस्पून दही फेटलेले

दीड टीस्पून तेल, मीठ चवीनुसार

चिकन मसाला बनवण्यासाठी

२ चमचे काळी मिरी, १ टेबलस्पून धणे

२ मोठी वेलची, १ हिरवी वेलची

३-४ लवंगा, १/४ टीस्पून मेथी दाणे

१/४ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून मोहरी

१ टेबलस्पून तळण्यासाठी तेल

२ तमालपत्र, २ हिरव्या मिरच्या

३ मध्यम आकाराचे कांदे चिरलेल

२ मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो

२ मोठे चमचे दही फेटलेले

१ टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली

१/२ टेबलस्पून बटर

अमृतसरी चिकन मसाला कृती

१. अमृतसरी चिकन मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम चिकन मॅरीनेट करून घ्या. यासाठी एका भांड्यात चिकन, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, धने पावडर, तिखट, हळद, तूप, चवीनुसार मीठ, दही घ्या. त्यात तेल घाला आणि चांगले मिक्स करा. मॅरीनेट होण्यासाठी २०-३० मिनिटे बाजूला ठेवा.

२. आता अमृतसरी चिकन मसाला बनवण्यासाठी काळी मिरी, धणे, काळी वेलची, हिरवी वेलची, लवंगा, मेथी दाणा, जिरे आणि मोहरी मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर बनवा. तर दुसरीकडे चिकन भाजण्यासाठी तव्यावर तेल गरम करून त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून दोन्ही बाजूंनी मऊ होईपर्यंत भाजून घ्या आणि वेगळ्या भांड्यात ठेवा.

३. चिकन भाजण्यासाठी प्रथम एका खोलगट भांड्यात तेल टाकून गरम करा. आता तेलात तमालपत्र, हिरवी मिरची, कांदा, बटर घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परता. आता तयार केलेला मसाला, टोमॅटो घालून चांगले परतून घ्या.

हेही वाचा >> Gatari 2024: गटारीनिमित्त घरच्या घरी बनवा ‘या’ झणझणीत नॉनव्हेज रेसिपी; खाणारे खातच राहतील अशी चव

४. यानंतर पाणी, दही, चवीनुसार मीठ घालून एक मिनिट चांगले शिजवा. आता त्यात भाजलेले चिकन घालून चांगले भाजून घ्या. आता यात आणखी थोटे पाणी घालून चिकन मध्यम आचेवर १०-१२ मिनिटे शिजवा. यानंतर त्यात थोडे बटर आणि कोथिंबीर घाला. तुमचं चविष्ट अमृतसरी चिकन तयार आहे. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून कोथिंबीरीने सजवा.

चिकन हंडी

चिकन हंडी साहित्य

५०० ग्राम चिकन
चिकन मॅरीनेट करण्यासाठी
१ टीस्पून काळीमिरी पूड
अर्ध्या लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
ग्रेव्ही साठी
२ टेबलस्पून तूप
२ मोठ्या कांद्याची पेस्ट
२ मोठे टोमॅटो
१०-१२ काजू
१ टेबलस्पून आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१०० ग्राम दही
१०० मि.ली पाणी
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून गरम मसाला
१ टेबलस्पून कसुरी मेथी

चिकन हंडी कृती

१. सर्वात आधी चिकनला काळीमिरी पूड, मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मॅरीनेट करा. त्यानंतर कांद्याची पेस्ट करून घ्या. टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घ्या.

२. त्यानंतर एका भांड्यात तूप गरम करा, त्यात कांद्याची पेस्ट रंग बदलेपर्यंत परतून घ्या, त्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून मिक्स करा.

३. २ मिनिटांनी त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालून परतावे, चिकनचा रंग बदलला की त्यात, लाल तिखट, हळद आणि थोडी कस्तुरी मेथी घालून परतून घ्या.

४. २-३ मिनिटे परतल्यावर त्यात टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून घ्या. आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात दही घालून घ्या आणि परत तेल सुटेपर्यंत थांबा.

५. नंतर त्यात पाणी घालून मिक्स करून घ्या. मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही

६. आता यात गरम मसाला, परत थोडी कस्तुरी मेथी आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

हेही वाचा >> पावसाळ्यात प्या मस्त गरमागरम क्रिम गार्लिक मशरूम सूप; लगेच नोट करा सोपी मराठी रेसिपी

७. चिकन शिजले आहे आणि आपली ग्रेव्ही ही मस्त तयार आहे. गरमगरम सर्व्ह करा आणि या पावसात या मसालेदार रेसिपीचा आनंद घ्या.