Gatari 2024 Special Non- veg Recipe: श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती ‘आषाढी अमावस्या’ ज्याला अलीकडे ‘गटारी अमावस्या’ असे ही म्हटले जाते. या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात आणि त्यावर ताव मारला जातो. कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही. यंदा ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.

गटारीच्या दिवशी खाद्यप्रेमी मटण, चिकन, मच्छीचा बेत करतात. कारण त्यानंतर त्यांना महिनाभर नॉनव्हेज खायला मिळणार नसते. महाराष्ट्रात ही गटारी साजरी केली जाते. या दिवशी अनेक घरांमध्ये हमखास चिकन, मटणाचा बेत असतोच. तुम्हीही जर गटारीचा बेत आखत असाल तर या गटारीला या रेसिपी नक्की ट्राय करा.

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

मटण चॉप्स फ्राय

साहित्य

१ किलो मटण चॉप्स, २ चमचे आलं-लसूण पेस्ट, २ चमचे मिरची-कोथिंबीर पेस्ट, २ चमचे गरम मसाला, १ चमचा हळद, २ अंडी, अर्धा कप ब्रेडचा चुरा, चवीपुरतं मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :

मटण चॉप्सला हळद-मीठ लावून थोडासा पाण्याचा हबकारा मारून कुकरमध्ये शिजवून घ्या. ३ शिट्टय़ा होऊ द्या. आता आलं-लसूण, मिरची कोथिंबीर, गरम मसाला एकत्र करून हे मिश्रण शिजलेल्या मटण चॉप्सना लावून घ्या आणि ते अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. आता एका भांडय़ात अंडी फेटून घ्या. एका भांडय़ात ब्रेडचा चुरा ठेवा. तळण्यासाठी तेल गरम करा. मसाला लावलेले मटण चॉप्स अंडय़ात बुडवून आणि ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून घ्या. मस्तपैकी तळून घ्या. मटण चॉप्स फ्राय तयार आहेत.

सुकं मटण

साहित्य :

अर्धा किलो मटण, १ चमचा हळद, बारीक चिरलेला १ कांदा, किसून तळून वाटलेलं अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धा मोठा चमचा आलं लसणाचं वाटण, २ मोठे चमचे लाल तिखट (४ लवंगा, ३ दालचिनी तुकडे, २ वेलदोडे, ५ मिरी, २ चमचे जिरे आणि धणे तव्यावर भाजून त्याची कुटून पूड करा), तेल अर्धी वाटी.

कृती :

मटणाला हळद, मीठ, तिखट, धणे-जिरे पूड, आलं लसूण वाटण लावून शिजवा. कढईत तेल घ्या. त्यात चिरलेला कांदा टाकून परता. त्यात खोबरं कांदा वाटून टाका. कुटलेला गरम मसाला पूड टाकून परता व शिजलेले मटण टाका, वरून लाल तिखटही टाका.

गार्लिक चिकन

हेही वाचा >> Chicken Soup Recipe: पावसाळ्यात शरीराला पौष्टिक असणारे एग चिकन सूप; घरी नक्की ट्राय करा

साहित्य :

१ किलो चिकन
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३ ते ४ लसूणचे कांदे
४०० ग्रॅम दही चिकन मसाला गरम मसाला
हळद, कसूरी मेथी
काश्मिरी मिर्च पावडर चवीनुसार मीठ

गार्लिक चिकन कृती :

प्रथम चिकनला मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या. एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही, एक चमचा तेल, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे. नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मॅरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे. गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कस्तूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या.चिकनच्या तुकडयांना हात न लावता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा व गॅस बंद करा.