Gatari 2024 Special Non- veg Recipe: श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती ‘आषाढी अमावस्या’ ज्याला अलीकडे ‘गटारी अमावस्या’ असे ही म्हटले जाते. या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात आणि त्यावर ताव मारला जातो. कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही. यंदा ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.

गटारीच्या दिवशी खाद्यप्रेमी मटण, चिकन, मच्छीचा बेत करतात. कारण त्यानंतर त्यांना महिनाभर नॉनव्हेज खायला मिळणार नसते. महाराष्ट्रात ही गटारी साजरी केली जाते. या दिवशी अनेक घरांमध्ये हमखास चिकन, मटणाचा बेत असतोच. तुम्हीही जर गटारीचा बेत आखत असाल तर या गटारीला या रेसिपी नक्की ट्राय करा.

Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?

पेशावरी कढई गोश्त बनवण्यासाठी साहित्य

१ किलो मटण दीड इंचाचे तुकडे

५-६ मध्यम आकाराचे टोमॅटो

५-६ हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापून)

२ चमचे आले चिरून

२ चमचे लसूण चिरलेला

२ चमचे चिरलेली कोथिंबीर

अर्धा कप तूप

२ चमचे मीठ

पेशावरी कढई गोश्त रेसिपी

१. हे बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून क्रिस-क्रॉस पद्धतीने कापून घ्या. आता एक पॅन मोठ्या आचेवर ठेवा आणि त्यात ३-४ कप पाणी गरम करा.

२. पाण्याला उकळी आल्यावर पॅनमध्ये टोमॅटो घालून झाकण ठेवून ३-४ मिनिटे शिजू द्या. आता पॅन गॅसवरून काढा आणि टोमॅटो १०-१५ मिनिटे थंड होऊ द्या.

३. यानंतर टोमॅटो पाण्यातून काढून त्याची साल काढा. आता पॅन मोठ्या आचेवर ठेवा आणि त्यात तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात मटण आणि मीठ घालून ४-५ मिनिटे परतून घ्या.

४. पॅनला घट्ट बसणारे झाकण ठेवा आणि मंद आचेवर २०-२५ मिनिटे शिजवा. मध्ये मध्ये मटण ढवळत राहा. आता सोललेले टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून चांगले मिक्स करा.

५. त्यानंतर पॅन पुन्हा झाकून ठेवा आणि एक तास किंवा मटण मऊ होईपर्यंत शिजवा.

हेही वाचा >> Gatari 2024: गटारीनिमित्त चिकनच्या ‘या’ दोन रेसिपी नक्की बनवा; खाणारे खातच राहतील अशी जबरदस्त चव

मटण कलेजी मसाला साहित्य

५०० ग्रॅम कलेजी
१/२ कप कांदा
१/२ कप टोमॅटो
१.५ टेबलस्पून मिक्स मसाला
१/२ टीस्पून हळद
१ टिस्पून गरम मसाला
२ टेबलस्पून आललसूण मिरची कोथिंबीर पेस्ट
२ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे वाटण
२ टीस्पून मीठ
तुकडा फोडणीत टाकण्यासाठी..१ तमालपत्र, दालचीनी
३ टेबलस्पून तेल
२ टेबलस्पून कोथिंबीर

मटण कलेजी मसाला बनवण्याची कृती

स्टेप १

कांदा,टोमॅटो चिरून घ्या. सुके खोबरे भाजून वाटून घ्या.आललसूण मिरची कोथिंबीर पेस्ट करून घ्या.माझ्याकडे नेहमी वाटलेले असते.

स्टेप २

आता कढईत किंवा घाई असेल तर छोटा कुकर घ्या. तेल घाला तापले की तमालपत्र, दालचिनी घाला, कांद्याला लालसर परतून घ्या, आता त्यात सर्व मसाले वाटणे घाला आणि परता.

स्टेप ३

नंतर टोमॅटो घाला नी मऊ होईपर्यंत शिजवा.शेवटी कलेजी घाला परतून घ्या नी वाफेवर शिजवायला ठेवा किंवा थोड्याचवेळात कुकरमधे असेच शिजवून थोडे पाणी घालून 3 शिट्ट्या घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.

स्टेप ४

मटण कलेजी मसाला तयार आहे नुसतीच स्टार्टर म्हणून खा किंवा चपाती, भाकरी बरोबर खाऊ छान लागते.