Gauri Pujan 2023 Naivedya: सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी काही वेगळे ,सोप्पे पदार्थ. नेहमीचा नैवैद्य आपण करतोच, पण हे जरा वेगळे पदार्थ. गौराईचे लाड करण्याचे, त्यांच्यासाठीचे खास भोजन. काही सोपे पण ‘खास’ पदार्थ. आता गौरी पूजनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे गौराईचा आवडता नैवद्य कोणता हे देखील तुम्ही अवश्य जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सज्जीगे साहित्य :
हा कर्नाटकी प्रकार आहे, अननसाचा शिरा
- बारीक रवा १ वाटी
- छान पिकलेला अननस छोटे तुकडे करून अर्धी वाटी
- साखर पाऊण ते अर्धा वाटी
- पाणी दीड वाटी वाटी
- आवडीने काजू ,वेलची,शक्यतो केशर नको.
सज्जीगे कृती
- तूप तापवून सुका मेवा परतून बाजूला करावा. त्यात हवं तर अधिक तूप घालून रवा मंद आगीवर सुरेख खमंग भाजून घ्यावा.
- बाजूला काढून, त्यात सुका मेवा मिसळून ठेवावा. पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे, त्यात अननस तुकडे घालुन उकळी आली की मंद आग करून ,रवा घालून, परतून साखर घालावी.
- व्यवस्थित ढवळून मंद आगीवर दणदणीत वाफ काढावी,शेवटी वेलची घालावी,वाटल्यास अननस इसेन्स घालू शकता, शेवटी घालावा.
पीठ पोळी/गवसणीची पोळी
कोकण आणि देशावरचा प्रकार,खीर,श्रीखंड,आमरस यासोबत देतात
साहित्य आणि कृती
- मोदकाच्या उकडीप्रमाणे एक वाटी तांदूळ पिठीची मऊ उकड काढून नीट मळून घ्यावी.पाण्यात तूप /लोणी घातल्यास चव आणि पोत चांगला येतो.
- कणिक एक वाटी घेऊन त्यात मोहन घालून छान तिंबून घ्यावी. कणकेचा उंडा करून त्यात उकडीचा गोळा भरून,उंडा बंद करून मैद्यावर पातळ लाटून पोळीसारखी लालसर शेकवून घ्यावी.
कढी:
गौरीच्या आवडत्या नैवेद्यात हरसूलं आणि पडवळ हे महत्त्वाचं मानलं जातं. हेच दोन घटक टाकून बनवल्या जाणाऱ्या कढीला कथली असे म्हणतात. गौरींच्या नैवेद्यात कथलीला बरंच महत्त्व आहे.
ज्वारीची आंबिल:
गौरीचा सर्वात आवडता पदार्थ जो प्रत्येकाच्या घरी नैवेद्याला केलाच जातो. तो म्हणजे आंबिल. आंबिल ही ज्वारीची बनवली जाते. काही ठिकाणी फोडणीची आंबिल बनवतात. तर काही ठिकाणी साधी (पांढरी) आंबिल बनवतात. तर मग जाणून घेऊया आंबिल बनविण्याच्या दोन्ही पद्धतींबद्दल…
फोडणीची आंबिल:
यासाठी सर्वात पहिले ज्वारीवर पाण्याच्या हबका मारून ती कुटली जाते. त्यानंतर चाळून त्यावरील टरफलं काढली जातात आणि उर्वरीत ज्वारी दळली जाते. मग आपण ते बाहेरून गिरणीवरून दळून आणि शकता किंवा आपल्या घरी मिक्सरवर पण बारीक करू शकता. ज्वारीचा भरडा तयार करायचा असतो म्हणजेच रव्या सारखी ज्वारी दळावी, अगदी बारीक पावडर होऊ देऊ नये. मग ही दळलेली ज्वारी पुन्हा चाळून घ्यावी. मग त्याची आंबिल बनवली जाते.
साधी (पांढरी) आंबिल :
तर साधी आंबिल बनवतांना वर सांगितल्याप्रमाणे पहिले तशीच ज्वारी बारीक करून घ्यायची. फोडणी देतांना मात्र फक्त पाण्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून आंबिल फोडणी करायची. ही आंबिल दूध-साखर घालून खाल्ली जाते.
हेही वाचा >> Rishi Panchami: ‘ऋषीची भाजी’ जाणून घ्या कशी बनवायची, ‘ही’ आहे बनवण्याची योग्य पद्धत
याशिवाय गौरी म्हणजेच महालक्ष्मी पूजनाला सोळा भाज्यांची एक भाजी केली जाते. या सोळा भाज्यांच्या भाजीचाही नैवेद्य महत्त्वाचा असतो. तसंच प्रत्येक विभागांमध्ये फुलोरा करण्याचं प्रमाण वेगळं आहे. फुलोरा म्हणजे करंजी, पाती, लाडू, अनारसे, वेणी-फणी, मोदक हे सर्व बनवून त्याचा नैवेद्य गौरी-महालक्ष्मींना दाखवला जातो. या फुलोऱ्याचंही सणाला खूप महत्त्व आहे.