Lauki Sabji or Bhaji Recipe: भोपळ्याची भाजी म्हटली की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खायचा कंटाळा करतात. पण दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने खाणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवू शकता. दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळी भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी ट्राय करा. कोणाला न आवडणारी दुधी भोपळ्याची भाजी सुद्धा सगळे आवडीने खातील.
गावरान पध्दतीने दुधीची भाजी साहित्य
- ५०० ग्राम दूधी भोपळा
- ५० ग्राम मूगाजी डाळ
- ५० ग्राम तीळकूट
- १ लाल मीर्ची
- ६-७ कढीपत्ता पाने
- १/२ टीस्पून हींग
- १/२ टीस्पून हळद
- १ टीस्पून तीखट
- १ टेबलस्पून गोडा मसाला
- १ टेबलस्पून धणेपूड
- १/२ टीस्पून मीठ
- १/२ टीस्पून साखर
- १ टेबलस्पून कोथींबीर
- ३ टेबलस्पून तेल
- पाणी आवशकतेनूसार
गावरान पध्दतीने दुधीची भाजी कृती
स्टेप १
वर दिलेले सगळे साहित्य एकत्र करून घ्या. दुधीची साल काढून चिरून घ्या. व पाण्यात घालून ठेवावे. म्हणजे काळे पडत नाही.
स्टेप २
मुग गरम पाण्यात भिजवुन घ्यावे. मिरच्या व शेंगदाणे भाजून घ्या.
स्टेप ३
मिरच्या,शेंगदाणे,लसूण,आले व कोथिंबीर दोन टेबलस्पून वाटून घ्या.
स्टेप ४
सगळ्यात आधी भोपळा व मुग शीजवून घ्या. पंधरा मिनिट लोमिडियम फ्लेमवर शीजते.झाकण ठेवून शिजवून घ्या
स्टेप ५
आता कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि वाटण घाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.हळद घालून घ्या परतून घ्या.
हेही वाचा >> बहुगुणी चंदन बटव्याची पातळ भाजी; सर्वांना आवडणारी हिवाळा स्पेशल झटपट आणि मस्त रेसिपी
स्टेप ६
मूगडाळ धूवून परतून घ्या आणि परत त्यात दूधी भोपळ्याच्या फोडी टाकून परतून घ्या. आता शीजवून घेतलेली भाजी घाला मीठ घालून घ्या. गरजेनुसार पाणी घालून घ्या.कोथेंबिर घाला.
स्टेप ७
सर्व्ह करा भाकरी किंवा भाता बरोबर