उन्हाळा सुरू झाला आहे आणि आपण सर्वजण थंड आणि ताजेतवाने पेयांचा आनंद घेण्यास उत्सुक आहोत. जेव्हा उन्हाळ्यातील पेयांबाबत चर्चा होते तेव्हा कोल्ड कॉफीचे नाव तर यायलाच पाहिजे. बरोबर ना! हे असे पेय आहे ज्याला जवळपास कोणीही विरोध करू शकत नाही. हे एक लोकप्रिय उन्हाळी पेय आहे जे तुम्हाला थंड आणि ताजेतवाने ठेवते. हे कॉफी, साखर आणि थंड दुध वापरून झटपट तयार केले जाते. कोल्ड कॉफी प्यायल्याने तुम्हाला उर्जा देखील मिळते. पण, खरे तर घरी कोल्ड कॉफी तयार करताना परफेक्ट फेस आणि घट्टपणा मिळवणे अवघड असू शकते. म्हणूनच आम्ही तुम्हाला परफेक्ट कोल्ड कॉफी तयार करण्यासाठी काही टिप्स देत आहोत. एकदा प्रयत्न करुन बघा तुम्हाला ही कोल्ड कॉफी नक्की आवडेल.

परिपूर्ण कोल्ड कॉफी तयार करण्यासाठी येथे ५ सोप्या पायऱ्या आहेत:

पहिली पायरी : चॉकलेट सिरप तयार करा

chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही: यशाकडे जाण्याची शिडी
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
kachya papayachi sukhi bhaji recipe in marathi bhaji recipe
कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा
green soup recipe In Marathi
Green Soup: संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर खूप भूक लागते? मग प्या भरपूर प्रोटीन असणार ग्रीन सूप; असं करा तयार!
BJP leader Munna Yadav explained about the abuse of the police Nagpur news
भाजप नेते मुन्ना यादवची कबुली, म्हणाले ” होय मी पोलिसांना शिवीगाळ केली, पण .. “
Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक
What are the benefits of bathing with camphor find out
पाण्यात कापूर टाकून अंघोळ केल्याने काय होतो फायदा? जाणून घ्या

एका भांड्यात एक मोठा चमचा डार्क चॉकलेट घ्या, त्यात गरम दूध घाला आणि चॉकलेट पूर्णपणे वितळेपर्यंत ते मिसळा.

कोल्ड कॉफी ( freepik)
कोल्ड कॉफी ( freepik)

हेही वाचा : Cucumber Cold Soup Recipe: उन्हाळ्यात प्या थंडगार काकडी सूप; दिवसभर राहा हायड्रेट

दुसरी पायरी : तुमचा ग्लास तयार करा

एक उंच ग्लास घ्या आणि चमच्याच्या मदतीने चॉकलेट सिरप ग्लासच्या आतील बाजूस फिरवून सजवा. सेट करण्यासाठी ग्लास फ्रीजमध्ये ठेवा.

तिसरी पायरी : फेस तयार करा

एका भांड्यात 3 चमचे कॉफी पावडर घ्या आणि त्यात 4 चमचे साखर आणि 1 चमचे गरम दूध घाला. मिश्रण ब्लेंडरने हलके आणि मऊ होईपर्यंत मिसळा.

कोल्ड कॉफी आईस्क्रिम ( Freepik)
कोल्ड कॉफी आईस्क्रिम ( Freepik)

हेही वाचा : ३ हटके पद्धतीने घरीच तयार करा लिंबू पाणी; उन्हाळ्यासाठी सर्वात्तम पेय

चौथी पायरी: कोल्ड कॉफी तयार करा

मिक्सर जारमध्ये दोन ग्लास थंड दूध घ्या. त्यात थोडी साखर, बर्फाचे तुकडे आणि फेसाळलेले मिश्रण घालून २ ते ३ सेकंद मिसळा.

पाचवी पायरी: कोल्ड कॉफी सजवा

फ्रीजमधून ग्लास काढा आणि त्यात एक चमचा फेसाळ मिश्रण टाका. आता त्यात तयार कोल्ड कॉफी टाका. त्यावर थोडी कॉफी टाकून सजवा. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही व्हॅनिला आइस्क्रीम देखील घालू शकता.

या सोप्या टिप्ससह, आपण या उन्हाळ्यात आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी कोल्ड कॉफी तयार करु शकता. तर, एकदा वापरून पहा आणि तुमच्या परफेक्ट कोल्ड कॉफीचा आनंद घ्या.