Gobhi Keema Recipe: कोबीची भाजी, कोबीची भजी अशा अनेक कोबीच्या रेसिपी तुम्ही घरच्याघरी बनवून पाहिल्या आहेत. पण या हिवाळ्यात तुम्हाला झणझणीत जर काही वेगळं आणि झणझणीत खायचं असेल तर तुम्ही कोबीचा खिमा तयार करू शकता. ही रेसिपी वाचूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.

साहित्य

एक कोबी

तेल

जीरे

चिरलेली लसूण

हिरवी मिरची

१ चिरलेला कांदा

१ चिरलेला टोमॅटो

१ टेबलस्पून मीठ

१ टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पूड

१ टेबलस्पून धणे पूड

१ टेबलस्पून गरम मसाला

उकडलेले मटार

कोथिंबीर

हेही वाचा… १० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी

रेसिपी

  1. एक कोबी घ्या. त्याचे तुकडे करा. उकळलेल्या पाण्यात धुवून घ्या आणि मग चिरा.
  2. नंतर एका कढईत तेल घाला, आणि त्यात जीरे, चिरलेली लसूण आणि हिरवी मिरची घाला.
  3. त्यात १ चिरलेला कांदा, १ चिरलेला टोमॅटो, १ टेबलस्पून मीठ, १ टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पूड, १ टेबलस्पून धणे पूड आणि १ टेबलस्पून गरम मसाला घाला.
  4. त्यात चिरलेली कोबी आणि उकडलेले मटार घाला.
  5. छान मिक्स करा आणि ५ मिनिटे शिजवा.
  6. कोथिंबीरने सजवा आणि आनंद घ्या.

हेही वाचा… तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी

पाहा VIDEO

Story img Loader