दीपा पाटील
साहित्य
साहित्य-अर्धा किलो चिकन, २ कांदे, ३ चमचे बेसन, १ चमचा कॉर्नफ्लोअर, १ चमचा लिंबूरस, अर्धा चमचा काळीमिरी पूड, १ चमचा चिली फ्लक्स, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, १ चमचा धने पूड, १ चमचा गरम मसाला,२ चमचे घट्ट दही, ३ चमचे आले-लसूण पेस्ट, १ ब्रेड स्लाइस, १ हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, तेल, धुरासाठी कोळसा.
कृती
कांदे बारीक चिरून परतून घ्यावेत. ब्रेड स्लाइस कुस्करून घ्यावी. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. चिकन खिमा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यात अजिबात पाणी ठेऊ नये. ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. त्यात सर्व मसाले, ब्रेड स्लाइस, कांदा, कोथिंबीर घालून पुन्हा वाटून घ्यावे. आता या मिश्रणावर गरम कोळसा ठेऊन त्यावर थोडेसे तेल टाकून त्याला खरपूस भाजल्याचा स्वाद आणावा. आता या मिश्रणाचे लांबडे गोळे बनवावे. त्याला चमचा किंवा स्ट्रॉच्या साहाय्याने मधोमध पोकळीसारखे छिद्र करून घ्यावे. यामुळे कबाब चांगले शिजतात. आता हे कबाब पॅनमध्ये तेल घालून त्यावर भाजून-परतून घ्यावे. सर्व बाजूनी लालसर झालेले कबाब कांद्याच्या चकत्यांसोबत आणि हिरव्या चटणीसोबत गट्टम करावेत.