रोज रोज जेवायला काय करायचं ? हा स्वयंपाक घरात वावरणार्या समस्त लोकांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न ! हा प्रश्न महिलांना पडत असतो. त्यातही नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आपल्याला काहीवेळा झणझणीत आणि चमचमीत काहीतरी खावसं वाटतं. अशावेळी जेवणात करता येईल अशी एक भन्नाट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ती म्हणजे गोळ्याची आमटी, खान्देशात केली जाणारी ही स्पेशल रेसिपी कशी करायची पाहूया
गोळ्याची आमटी साहित्य –
- १ वाटी बेसन, १ चमचा लाल तिखट
- अर्धा वाटी किसलेले सुके खोबरे, २ कांदे
- अर्धा इंच आल्याचा तुकडा, ७-८ लसूण पाकळ्या
- १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे-जिरेपूड
- अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ
- कोथिंबीर, ४ चमचे तेल
गोळ्याची आमटी तयारी-
बेसनपिठात अर्धा चमचा तिखट, चवीपुरते मीठ व ४ चमचे कडकडीत गरम केलेले तेल घालून पीठ भिजवा व त्याचे छोटे छोटे गोळे तेलात तळून काढा. खोबरे, लसूण, आले, कोथिंबीर सर्व पदार्थ बारीक कुटून तसेच कांदे बारीक चिरुन घ्या.
हेही वाचा – कोबीच्या खमंग कुरकुरीत वड्या; न खाणारेही आवडीनं खातील, जाणून घ्या सोपी रेसिपी
गोळ्याची आमटी कृती –
कढईत थोडेसे तेल टाकून त्यात फोडणी साहित्य घाला. त्यानंतर कांदा घाला व साहित्य घाला. त्यानंतर कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या. त्यात थोडे पाणी घाला. चवीसाठी मीठ, गरम मसाला, हळद, धणे-जिरेपूड व कोथिंबीर टाकावी व हे मिश्रण चांगले उकळूण घ्या. जेवणापू्र्वी पुन्हा गरम करुन त्यात केलेली गोळाभाजी घाला. नंतर कोथिंबीर घालून ही गोळ्याची गरमागरम आमटी भाकरी किंवा चपातीसोबत खायला घ्यायची.