Shravani Ghevada Bhaji : दत्तजयंतीनिमित्त सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा केली जाते. दत्तजयंतीला खास नैवद्य दाखवला जातो. दत्ताच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. दत्ताला घेवड्याची भाजी सुद्धा खूप आवडायची. त्यामुळे अनेक जण दत्तजयंतीला घेवड्याची भाजी करतात. तुम्हाला माहिती आहे का घेवड्याची भाजी कशी बनवायची? अगदी सोपी रेसिपी आहे. घेवड्याची भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवीला अप्रतिम वाटते. जाणून घेऊ या ही सोपी रेसिपी

साहित्य

  • कोवळे घेवडे
  • तेल
  • जिरे
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिंग
  • हळद
  • मिरची पावडर
  • मीठ
  • जिरेपूड
  • धनेपूड
  • आमचूर पावडर
  • गरम मसाला
  • मिरेपूड
  • शेंगदाण्याचा कुट
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा : यंदा नवीन वर्षाला काय गोड काय बनवताय? साजूक तुपातला बदाम शिरा बनवा, रेसिपी जाणून घ्या

कृती

  • सुरुवातीला एका भांड्यात कोवळा घेवडा घ्या.
  • त्यानंतर त्या घेवड्याची देठे काढून घ्या
  • त्यानंतर घेवडा छान बारीक बारीक चिरुन घ्या.
  • गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल गरम करा.
  • गरम तेलात जिरे, मोहरी टाका.
  • त्यानंतर त्यात कढीपत्ता टाका.
  • मोहरी छान तडतडली की आपल्या भाजीला छान चव येते.
  • त्यात हिंग, हळद आणि मिरची पावडर घाला आणि चांगले परतून घ्या
  • या फोडणीनंतर त्यात श्रावणी घेवडा घाला.
  • त्यात वरुन चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर हा घेवडा मध्यम आचेवर पाच मिनिटांसाठी परतून घ्या.
  • त्यात थोडे पाणी घाला आणि घेवडा मंद आचेवर शिजवून घ्यावा.
  • अधून मधून ही घेवड्याची भाजी परतून घ्यावी आणि झाकण ठेवून शिजू द्यावी.
  • आता शिजलेल्या भाजीमध्ये थोडी मिरची पावडर, जिरे पावडर, धनेपूड, आमचूर पावडर, गरम मसाला आणि मिरेपूड घाला.
  • त्यानंतर थोडं त्यावर तेल घाला आणि दोन मिनिटांसाठी ही भाजी झाकून टाका.
  • त्यानंतर भाजीला चव येण्यासाठी शेंगदाण्याचा कुट घाला शेंगदाण्याचा कुट खूप बारीक करू नका. जाडसर कुट टाका.
  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि चांगले परतून घ्या
  • त्यानंतर थोडी भाजी शिजवून घ्या.
  • श्रावणी घेवड्याची ही भाजी तयार होईल.

Story img Loader