शुभा प्रभू-साटम
साहित्य
हिरव्या मिरच्या ५-६ (शक्यतो कमी तिखट घ्याव्या), ओलं खोबरं १ वाटी, धणे १०-१२ दाणे, मिरी ५-६ दाणे, आले थोडं, कोकम, गूळ, हळद, मीठ, तेल
कृती
अर्ध्या मिरच्या घेऊन ओलं खोबरं, हळद, धणे मिरी आणि आले हे सर्व अगदी गुळगुळीत वाटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात राई, हिंगाची फोडणी करा. त्यात उरलेल्या मिरच्या घालून त्या साधारण पांढरट होईतो परता आणि थोडे पाणी, हळद घालून एक उकळी काढा. आता ओल्या खोबऱ्याचे वाटप घालून गूळ, मीठ, कोकम घालून मंद आगीवर थोडा वेळ शिजवा. मिरच्या कमी तिखट घ्या. प्रमाण आवडीनुसार कमी-अधिक करा.
टीप – डाळीचा कंटाळा येतो आणि कडधान्ये नको वाटतात तेव्हा अशी तिखट आमटी छान चव देते.