बऱ्याचदा कुणी पाहूणे जेवायला येणार असतील तर पराठा, पोळ्या किंवा पुऱ्या आणि वेगवेगळ्या भाज्या असा आपला बेत ठरून जातो. पण मग भाताचं काय करावं हे कळत नाही. साधा भात ठेवावा की आणखी काही करावं, असा नेहमीचा प्रश्न. मग सारखं सारखं जीरा राईस करणंही नको वाटतं. मसालेभात तर नेहमीच करतो त्यामुळे तो ही करावा वाटत नाही. मग अशावेळी भाताचा काही वेगळा प्रकार करावा वाटत असेल तर चटपटीत ग्रीन पुलाव नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा हा चटपटीत ग्रीन पुलाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रीन पुलाव साहित्य –

  • तांदूळ १ कप, हिरवे मूग पाव कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर पाव कप
  • बारीक चिरलेला पुदिना पाव कप
  • हिरवी मिरची १, लिंबाचा रस २ चमचे
  • आलं-लसूण पेस्ट १ चमचा, मीठ चवीनुसार
  • तेल दोन चमचे, ओवा पाव चमचा, हिंग, हळद.

ग्रीन पुलाव कृती –

  • मसाला करण्याकरिता, हिरवे मूग, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस घालून मिश्रण मिक्सरमधून बारीक
  • करावे. पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यात ओवा, हिंग घालून परता.
  • त्यामध्ये सर्व मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, भिजवलेला तांदूळ घालून प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्या कराव्यात.
  • कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक- लसूण पेस्ट टाका.
  • यानंतर बारीक चिरलेले गाजर, मटार टाका आणि परतून घ्या.
  • सगळ्यात शेवटी भातावरून पुन्हा थोडे बटर टाका आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि सगळे मिश्रण हलवून हलकी वाफ येऊ द्या.

हेही वाचा – Lassi Recipe: मसाला बीटरूट लस्सी, कडक उन्हाळ्यात मिळेल थंडावा!

  • चांगली वाफ आली की गरमागरम तवा पनीर पुलाव सर्व्ह करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green pulao recipe if you want to eat something light but tasty then make green pulao at home marathi recipe srk
Show comments