Gudi padwa 2024 Special recipe: चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. हा सण म्हणजे मराठी नूतन वर्षांचा प्रारंभ. या दिवशी घरोघरी गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात.गुढीपाडव्याला घरोघरी खमंग पाककृतींचा खास बेत आखला जातो. चला तर मग यावर्षी गुढी पाडव्याला एक खास रेसिपी ट्राय करु. डाळिंबीची उसळ हा पदार्थ महाराष्ट्रीन स्वयंपाकात नेहमी असतोच. कारण सणसुद असू दे अथवा घरातील लग्नकार्य पंगतीच्या जेवणात डाळिंबी उसळ असायलाच हवी. काहीजण या भाजीला बिरडं अथवा वालाची भाजी असं म्हणतात. डाळिंब्यांची उसळ करण्याची तयारी मात्र आधीचकरावी लागते. यासाठी दोन दिवस आधी वाल भिजत घाला आणि एक दिवस भिजलेल्यानंतर आदल्या दिवशी ते एका सुती कापडात गुंडाळून ठेवा. ज्यामुळे त्याला छान मोड येतील.

डाळिंबी उसळ साहित्य

  • दोन वाटी सोललेले वाल
  • तेल
  • मोहरी
  • पाव चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • हळद
  • एक चमचा लाल तिखट
  • चार- पाच कढीपत्ता
  • सुके खोबरे
  • गूळ
  • आमसूल
  • कोथिंबीर
  • किसलेला ओला नारळ
  • चवीपुरतं मीठ

गुढीपाडव्यासाठी डाळिंबी उसळ करण्याची कृती –

१. मोड आलेले वाल कोमट पाण्यात भिजवून सोलून ठेवा ज्यामुळे ते सोलणं सोपं जाईल.

२. कढईत किसलेला सुका नारळ, जिरे भाजून मिक्सरमध्ये वाटून वाटण तयार करा.

३. कढईत तेलाची फोडणी करून त्यात जिरे, हिंग, तिखट कढीपत्ता, कोथिंबीर घालून डाळिंब्या परतून घ्या. पाणी टाकून त्यात जिरे आणि खोबऱ्याचे वाटण टाका.

४. भाजी शिजून उकळ आली की आमसूल आणि मीठ टाका. गॅस बंद करून ओले खोबरे पेरा.