How to Make Sakhrechya Gathi in 10 Minutes : गुढीपाडवा हा सण हिंदु नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. मराठी महिन्यांच्या सुरुवात चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याच्या सणापासून होते. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढी उभारतात. गुढीला सुंदर साडी नेसवतात. त्यावर गडू उलटा ठेवला जातो. कडुलिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने बांधतात. तसेच साखरेच्या गाठी देखील बांधल्या जातात. गुढीची पुजा केली जाते आणि गुढीला नैवद्य दाखवला जातो. कडुनिंबाचा पाला आणि गूळ प्रसाद म्हणून वाटला जातो. लहान मुलांना गोड साखरेची गुडी खायला दिली जाते. गुढीपाडव्याला या साखरेच्या गाठींचे खास महत्त्व आहे. या गाठी पांरपारिक पद्धतींनी घरी बनवता येऊ शकतात. तेही फक्त १० मिनिटांत. चला तर मग रेसिपी जाणून घेऊ या…
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी कशा बनवाव्या (How to make Sakhar Gathi for Gudi Padwa)
साखरेच्या गाठी साहित्य
साखर – १ कप
दूध – १/२ टेबलस्पून
तूप – १ टेबलस्पून
पाणी – १/२ कप
धाग्याची गुंडी
साखरेच्या गाठी कृती (Sakhrechya Gathi Recipe)
प्रथम एक कढई गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा आणि त्यात एक वाटी साखर आणि अर्धा कप पाणी घाला. हळू हळू चमच्याने साखर विरघळे पर्यंत मिश्रण हलवत राहा
आता एक दोरा पाण्यात भिजवून घ्या. एका ताटाला किंवा अप्पे पात्राला तूप लावून घ्या आणि त्यावर तूप लावून गाठीसाठी लागेल इतका धागा पसरवून ठेवा.
साखरेच्या पाकात २ चमचे दूध आणि पाकावरील मळी चमच्याने वरचे वर काढून टाका.
एक चमचा फ्रुट सॉल्ट मिश्रण एकत्र करून घ्या आणि सतत चमच्याने मिश्रण हलवत राहा.
साखरेचा पाक तयार होईपर्यंत चमच्याने मिश्रण हलवत राहा. पाक तयार झाला आहे का पाहण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या आणि साखरेच्या पाकाचा एखादा थेंब त्यात टाका. पाक थंड झाला त्याची गोळी करू पाहा. गोळी तयार झाली की तुमचा पाक तयार आहे असे समजा.
आता ताटावर किंवा अप्पे पात्रावर पसरलेल्या दोऱ्यावर गरम गरम साखरेचा पाक गोलाकार आकारात चमच्याने ओता आणि ते थंड करण्यासाठी ठेवा.
थंड झाल्यानंतर हळुवारपणे ताटाला चिकटलेल्या साखरेच्या गाठी काढा. गुढीपाडव्यासाठी साखरेच्या गाठी तयार आहेत.
इंस्टाग्रामवर annapurna_amruta पेजवर साखरेच्या गाठीची रेसिपीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.