Gul Papdi : सध्या हिवाळा सुरू आहे. अनेकदा हिवाळ्यात गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनशक्ती वाढते, वजन कमी करण्यास मदत होते, सांधेदुखीचा त्रास दूर होतो आणि शरीरात उष्णता निर्माण होते. तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांद्वारे गुळ खाऊ शकता. उदा, गुळाची पोळी, तीळ गुळाचे लाडू, गुळाचे पेढा, गुळाचा चहा, गुळाची चटणी इत्यादी. याबरोबरच तुम्ही गुळाची पापडी सुद्धा खाऊ शकता. गुळाची पापडी ही बनवायला अतिशय सोपी आहे. गुळ आणि गव्हाच्या पीठापासून बनवली जाणारी गुळ पापडी चवीला स्वादिष्ट आणि अत्यंत पौष्टिक आहे. ही गुळाची पापडी एकदा बनवून तुम्ही अनेक दिवस ही पापडी खाऊ शकता. ही पापडी कशी बनवायची, चला तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • बारीक किसलेला गुळ
  • गव्हाचे पीठ
  • तूप
  • सुखे खोबरे
  • काजू बदामचे बारीक तुकडे
  • तीळ
  • वेलची पूज
  • खसखस

हेही वाचा : हिवाळ्यात बनवा गरमा गरम कुरकुरीत पालक भजी, लगेच जाणून घ्या ही सोपी रेसिपी

कृती

  • एका कढईत गव्हाचे पीठ घ्या आणि हे पीठ कोरडे भाजून घ्या
  • त्यानंतर त्यात तूप घालून कमी आचेवर पुन्हा हे पीठ चांगले भाजून घ्या.
  • तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. पीठ नीट भाजले तर चांगले नाहीतर गुळ पापडीला चव येणार नाही.
  • जवळ पास हे पीठ २०-२५ मिनिटे भाजून घ्या.
  • त्यानंतर गुळ बारीक किसून घ्या आणि किसलेला गुळ गॅस बंद करुन या भाजलेल्या गव्हाच्या पीठामध्ये टाका.
  • त्यानंतर मंद आचेवर हा गुळ गव्हाच्या पीठामध्ये परतून घ्या.
  • त्यानंतर यात वेलची पूड, खसखस आणि आवडीनुसार सुखे खोबरे, काजू बदाम, तीळ सुद्धा घालू शकता.
  • हे मिश्रण चांगले एकत्र करा.
  • एका प्लेटला तूप लावून घ्या.
  • या प्लेटवर हे कढईतील मिश्रण टाका आणि वड्याच्या आकाराने हे मिश्रण कट करुन घ्या.
  • त्यानंतर २० मिनिटांनी या वड्या पुन्हा सुरीने सैल करुन घ्या.
  • गुळ पापडी तयार होईल.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gul papdi recipe how to make gul papdi food for winter recipe ndj