Gul Poli : हिवाळ्यात तीळ गुळ आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळाची पोळी तर प्रत्येकाची घरी आवडीने बनवली जाते. गुळाचे अनेक फायदे आहेत गुळ खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही याशिवाय रक्ताची कमतरता सुद्धा कमी होते. ज्यांना हिवाळ्यात सर्दी खोकला वारंवार होतो त्यांनी गुळाची पोळी खावी. गुळाची पोळी ही फक्त पौष्टिकच नाही तर याची चवसुद्धा अप्रतिम वाटते. गुळ पोळी लहान मुलांना खूप आवडते जर तुमच्या मुलांना हिवाळ्यात सातत्याने सर्दी खोकला होत असेल तर तुम्ही त्यांना आवर्जून ही गुळाची पोळी हिवाळ्यात खाऊ घालायला पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला माहिती आहे का गुळाची पोळी कशी बनवली जाते? खरं तर गुळाची पोळी अनेक प्रकारे बनवली जाते. गुळाच्या पोळीच्या अनेक पारंपारिक रेसिपी लोकप्रिय आहे आज आपण गुळाच्या पोळीची एक हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. जाणून घेऊ या.

साहित्य :

  • गव्हाचे पीठ
  • मीठ
  • तेल
  • गुळ
  • तूप
  • खाण्याचा चुना
  • जायफळ
  • वेलची पावडर
  • सुंठ पावडर

हेही वाचा : कांद्याच्या पातीची भजी खाल्ली का? अप्रतिम चव अन् कुरकुरीत ही भजी नक्की खा, लगेच ही सोपी रेसिपी नोट करा

सारण :

सुरुवातीला किसलेला गुळ एका भांड्यात घ्या.
यात खाण्याचा चुना, जायफळ, वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाका आणि मिश्रण एकत्र करा.
त्यानंतर यात तूप घालून खलबत्त्याच्या साहाय्याने वाटून घ्या. गुळाचे सारण तयार होईल.

कृती:

  • सुरुवातीला एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ घ्या.
  • त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर त्यात गरम केलेलं तेल घाला आणि मिश्रण एकजीव करा.
  • त्यानंतर हे गव्हाचं पीठ पाण्याने चांगले मळून घ्या.
  • गव्हाच्या पीठाचा कणीक तयार होईल.
  • गव्हाच्या पिठाची जाडसर पोळी लाटून घ्या त्यानंतर त्यात गुळाचे सारण भरा.
  • आणि पुन्हा पोळी नीट लाटून घ्या.
  • गरम तव्यावर तूप टाका आणि गुळाची पोळी दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • गुळाची पोळी तयार होईल.
  • ही गरमा गरम पोळी तुम्ही सर्व्ह करू शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gul poli recipe how to make gul poli best and healthy food in winter ndj