Gulabo Sitabo Recipe in Marathi: सणासुदीच्या दिवसात आपण अनेकदा बाहेरून मिठाई, बर्फी आणतो. अनेकजण घरही गोड पदार्थ बनवतात. पण अनेकदा काहीतरी वेगळं करायच्या नादात पुन्हा पुन्हा तेच पदार्थ बनवले जातात. कारण नवीन पदार्थ बनवायला वेळही तितकाच जातो आणि तो नीट बनेल की नाही याची शाश्वती नसते. पण आज आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत, जी बनवायला तर खूपच सोपी आहे पण चवीला अगदीच छान आहे. चला तर मग जाणून घेऊ या, गुलाबो सीताबो मिठाई घरी कशी बनवायची ते…

साहित्य

  • 1 कप तांदळाचे पीठ
  • 1 कप पिठीसाखर
  • 2 कप दूध
  • 1/2 कप किसलेलं खोबरं
  • 1/2 मिल्क पावडर
  • 1/3 कप रोज सिरप
  • 1/4 ड्राय फ्रुट्स
  • 3 टेबलस्पून तूप
  • 2 ड्रॉप पिंक लिक्विड फूड कलर

कृती

तांदळाचे पीठ पॅनमध्ये घालून ड्राय रोस्ट दोन-तीन मिनिट करून घ्यावे.

आता गॅसवर दुसरं पंँन गरम करायला ठेवणे, त्यामध्ये दूध घालावे दुधाला उकळी आली की त्यामध्ये साखर, खोबरं कीस, मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

आता यामध्ये रोज सिरप घाला, मी दोन-तीन ड्रॉप गुलाबी फूड कलर घालून परत मिक्स करून घेतले, आता यामध्ये तांदळाचं पीठ घालावे, आणि मिक्स करत राहायचे, ड्राय फ्रुट्स थोडे घालून द्यावे आणि थोडे गार्निशिंगसाठी ठेवावे.

आता यामध्ये तीन चमचे तूप घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे, आणि घट्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यावे.

आता याचा छान गोळा तयार झाला असेल त्याला हलकेच थंड होऊ द्यावे आणि गरम असतानाच मळून घ्यावे, हे मिश्रण खूप गार होऊ देऊ नये. गरम असतानाच याचे लाडू च्या आकाराचे पेढे तयार करून घ्यावेत.

एका प्लेटमध्ये खोबर्‍याचा किस पिठीसाखर आणि ड्रायफ्रुट्स हे काढून घ्यावे. आणि त्यामध्ये हे घोळून घ्यावे.

आता आपली छान सिंपल इन्ग्रेडियंट पासून बनलेली मिठाई तयार आहे, साध्या उकडी पासून मीही मिठाई तयार केलेली आहे. गार्निशिंग हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कसे गार्निशिंग करायचे आहे.

नोट- ही रेसिपी कुकुपॅडवरून घेण्यात आलेली आहे.