गोड पदार्थांमध्ये ‘खीर’ हा प्रकार बहुतांश लोकांना आवडतो. काही प्रकारच्या खीर रेसिपीमध्ये साखरेचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहोत त्यामध्ये गोडवा आणण्यासाठी सेंद्रिय गूळ वापरतात. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हा पारंपरिक गोड पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही खीर खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते, असे म्हणतात. बिहारमध्ये गुळाची खीर ‘रसिया’ या नावाने तर उत्तर प्रदेशातील पश्चिम भागामध्ये ‘रसखीर’ या नावाने प्रसिद्ध आहे.

गुळाची खीर साहित्य

१ कप भाजलेले तांदूळ
२ लिटर दूध
१०० ग्रॅम गूळ
४ हिरव्या वेलची
१/२ कप ड्राय फ्रूट्स १ टीस्पून चारोळी

गुळाची खीर कृती

एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये चार कप दूध मिक्स करा. दूध थोडेसे घट्ट होईलपर्यंत ढवळत राहा.

दूध घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलची पावडर आणि दोन चमचे भिजवलेले तांदुळ मिक्स करा. दूध ढवळत राहा म्हणजे ते पॅनला चिकटणार नाही. यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यास ठेवून द्या.

आता दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करा. त्यामध्ये काजू आणि मनुके फ्राय करून घ्या. फ्राय केलेले काजू आणि मनुका वेगळे ठेवा.

आता याच पॅनचमध्ये तुपामध्ये गूळ पावडर परतवून घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा.

आता दुधामध्ये काजू आणि मनुक्यांचा समावेश करा आणि सामग्री नीट मिक्स करून घ्या. थोड्या वेळाने यात गुळाचा पाकही मिक्स करा.

हेही वाचा >> भाजी पोळीचा कंटाळा आला बनवा पारंपरिक बिहारी “आलू चोखा” ही घ्या सोपी रेसिपी

खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. एका बाउलमध्ये खीर सर्व्ह करा आणि सजावटीसाठी सुकामेव्याचा वापर करा.

टीप : खीर तयार करण्यासाठी सेंद्रिय गूळ पावडरचाच वापर करावा.