Handvo Recipe In Marathi: गुजरातमधील अनेक डीश प्रसिद्ध आहेत. त्यात जलेबी फाफडा, ढोकळा, खांडवी असे अनेक पदार्थ गुजराती बांधवांसह बाकीचेही आनंदाने खातात. गुजरात जसं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसंच येथील स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक वर्षभर तेथे येत असतात. पण तुम्हाला गुजराती पदार्थ ट्राय करण्यासाठी गुजरातला जाण्याची गरज नाही. आज आपण अशीच एक गुजराती डिश ट्राय करणार आहोत, ती म्हणजे हांडवो. चला तर मग जाणून घेऊया हांडवो बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कशा प्रकारे बनवायची ही डिश.
साहित्य
- 1 कप हांडवो मिक्स पीठ
- 1 कप पाणी
- 3 टीस्पून दही
- 3 टीस्पून तेल
- 1/2 कप बारीक चिरलेली मेथी (ऑप्शनल)
- 3 ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- 1 टीस्पून बारीक चिरलेले आले
- कोथिंबीर
- 1/2 टीस्पून साखर
- मीठ चवीनुसार
- 1/2 टीस्पून हळद
- 1/4 टीस्पून हिंग
- 1/2 टीस्पून इनो
- 1 टेबलस्पून पांढरे तीळ
- 1 टीस्पून धणेपूड
कृती
प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.
आता एका वाडग्यामध्ये हांडवो मिक्स पीठ, घ्या. त्यामध्ये हिंग,हळद,मीठ,साखर,धणेपूड घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या.
आता वरील मिश्रणात मिरच्या, आले,बारीक चिरलेली कोथिंबीर, मेथी,दही तेल घालून एकत्र करा आणि पाणी घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. गुठळ्या राहता कामा नयेत आणि दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा.
आता ह्या वरील मिश्रणात तीन ते चार टीस्पून पाणी घालून परत मिश्रण एकजीव करून घ्या.
आता एकीकडे पँन मध्ये तेल मोहरी, हिंग जीरे आणि तीळ घालून खमंग फोडणी करून घ्या.
आता या फोडणीवर वरील भिजवलेले पीठ घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर पाच ते सहा मिनिटे सोनेरी रंगावर शिजवून घ्या. जास्त वेळ शिजवू नये आणि तसेच गॅसची फ्लेम लो low ठेवावी नाहीतर हांडवो खालून जळतो.
आता हांडवो एका ताटात काढून घ्यावा आणि त्याच पॅनमध्ये थोडे तेल जीरे, हिंग मोहरी तीळ घालून खमंग फोडणी तयार करून घ्या आणि हांडवोची दुसरी बाजू देखील सोनेरी रंगावर फ्राय करुन घ्या.
तयार झाला आपला क्रिस्पी,खमंग हांडवो. पाच ते दहा मिनिटे गार करून घ्या.नंतर हव्या त्या आकारात वड्या पाडून वरुन कोथिंबीर घालून चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.
नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.