संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या आवर्जून केले जातात. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देण्यासाठी तीळ अतिशय फायदेशीर असतात. तीळामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. तसेच तीळ हे प्रोटीन आणि ओमेगा ३ चा स्त्रोत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यासाठी तीळ खाणे फायदेशीर असते. मकर संक्रांत हा महाराष्ट्र, गुजरात आणि देशाच्या बऱ्याच भागात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण. या सणाला तीळ-गूळाची पोळी आवर्जून केली जाते. चला तर पाहुयात तीळ-गुळाची पोळी कशी बनवायची.
तीळ-गुळाची पोळी साहित्य :
- तीळ – एक वाटी
- भाजलेले शेंगदाणे – एक वाटी
- गूळ – एक वाटी वेलची पावडर – दीड चमचा
- गव्हाचे पीठ – दीड वाटी, मैदा – अर्धी वाटी
- तेलाचे मोहन – पाव वाटी
- मीठ – चवीनुसार
- साजूक तूप – दोन चमचे
तीळ-गुळाची पोळी कृती :
- तीळ भाजून घ्या. शेंगदाणे, तीळ, गूळ सर्व एकत्र करून वाटून घ्या.
- नंतर त्यात वेलची पावडर, तूप घालून परत एकत्र वाटा. सारण तयार होईल.
- गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या.पिठाची पारी करून त्यात सारण भरा.
- तांदळाच्या पिठावर पोळी लाटून तेल सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.या पोळ्या संक्रांतीला केल्या जातात.
हेही वाचा >> Makar Sankranti 2024: तिळाचे लाडू नेहमीच बनवतो यंदा ट्राय करा ‘तिळाच्या वड्या’, पटकन नोट करा सोपी रेसिपी
- या पोळ्या चांगल्या टिकतात, त्यामुळे प्रवासात घेऊन जाता येतात. संक्रांतीला तीळ, गुळाचे पदार्थ खाल्ले जातात. त्यात ही पोळी महत्त्वाची आहे.