हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. मात्र, ही भाजी आपल्याकडे जास्त प्रमाणात खाल्ली जात नाही. या भाजीत भरपूर प्रमाणात असलेले पॉटॅशियम आणि कॅल्शियम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चला तर मग पाहुयात थंडी स्पेशल ओली हरभऱ्याची भाजी..
ओली हरभऱ्याची भाजी साहित्य
७ ते ८ लसून पाकळ्या
२ चमचे मिरची चा ठेचा
२ चमचे दाण्याचा कूट
हरभऱ्याची कोवळी भाजी
फोडणीसाठी जीरे
ओली हरभऱ्याची भाजी कृती
स्टेप १
प्रथम हरभऱ्याची भाजी निवडून घ्या स्वच्छ पाण्याखाली धुऊन निथळत ठेवा.
स्टेप २
लसूण ठेचुन घ्या, कढई तापत ठेवा यामध्ये तेल घालून जिर्याची फोडणी करा.
स्टेप ३
तेलामध्ये लसूण परतून घ्या. या नंतर यामध्ये केलेला ठेचा घाला.
स्टेप ४
यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि झाकण ठेवून भाजी शिजू द्या. मध्येमध्ये भाजी परतत रहा यातील पाणी आटत आल्यानंतर यामध्ये दाण्याचा कूट घाला. आणि भाजी पुन्हा परतून घ्या.
हेही वाचा >> घरीच बनवा हॉटेलसारखं मसाला काजू पनीर; ही सोपी रेसिपी फॉलो करा
स्टेप ५
पाच ते सात मिनिटात ही भाजी तयार होते. गरम गरम भाजी भाकरी बरोबर खायला द्या.