महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अंत्यत वैविध्यपूर्ण आहे. अनेक चविष्ट पदार्थ आहे जे लोकांना खूप आवडतात. त्यापैकीच एक म्हणजे थालपीठ. थालपीठ हे खायला चविष्ट आहेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. विविध धान्यांच्या पीठापासून तयार केलेले थालपीठ अत्यंत पौष्टिक असते. गरमा गरम थालपीठ खाण्याची मज्जा वेगळीच असते. तुम्हालाही थालपीठ आवडत असेल आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत.
तुम्ही पारंपारिक पद्धतीने तयार केले जाणारे थालपीठ नेहमीच खात असाल आता यावेळी तुम्ही वांग्याचे थालीपीठ खाऊन पाहा. ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल पण हा त्याची चव अप्रतिम आहे. तुम्हाला हा नक्का आवडेल. हे बनवायलाही सोपे आहे. चला जाणून घेऊ या रेसिपी
साहित्य
भरीत करण्यासाठीचे हिरवे वांगे- १
ज्वारीचे पीठ – १ वाटी
गव्हाचे पीठ – १ वाटी
बेसन -१ वाटी
वाटण – हिरवी मिरची, लसूण, आलं
कोथिंबीर – आवडीनुसार
धने पावडर – १ चमचा
जिरे पावडर – १ चमचा
हळद – १ चमचा
मीठ – चवीनुसार
हेही वाचा – पाण्याशिवाय अंडी कशी उकडवावी? गावाकडे वापरली जाणारी हटके पद्धत एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
हेही वाचा – आजीबाईंनी तव्यात रगडल्या मिरच्या अन् बनवला झणझणीत ठेचा! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच!
कृती
सर्वप्रथम वागे स्वच्छ धूवून घ्या.
त्यानंतर वांग्याला चारी बाजूने काप करा
त्याला तेल लावून घ्या
त्यानंतर चुलीमध्ये जळत्या कोळशाळ्या निखाऱ्यावर अथवा गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्या.
सर्व बाजूने वांगे छान खरपूस भाजून घ्या.
वांग्याची साल काढून, वांगे व्यवस्थित साफ करून स्मॅश करून घ्या.
भरीतासाठी एका खलबत्यामध्ये टण – हिरवी मिरची, लसूण, आलं ठेचून घ्या
कांदा बारीक चिरून घ्या
एका परातीमध्ये बेसन, गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ घ्या.
त्यात हिरवी मिरची, लसूण, आलं
वाटण त्यात टाका.
त्यानंतर कांदा आणि कोथिंबीर टाका.
भाजलेले वांगे टाका
मीठ आणि हळद टाका आणि पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्या.
पोळपाटावर एक कापड टाकून पीठाचा एक गोळा त्यावर ठेवा. आणि हात ओला करून हलक्या हाताने थालपीठ थापून घ्या.
गरम तव्यावर खरपूर भाजून घ्या आणि दह्याबोरबर खा.