नाश्त्यासाठी जवळपास सर्व महाराष्ट्रीयन घरात पोहे आणि उपमा हमखास बनवला जातो आणि तितक्याच आवडीने तो खाल्ला जातो. पण रोज रोज तेच तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो. नेहमीच्या पोह्यांशिवाय दडपे पोहे, दही पोहे, बटाटा पोहे असे विविध प्रकार केले जातात. त्याप्रमाणे उपम्याचे देखील वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.

सहसा उपमा हा रव्याचा किंवा शेवयांचा बनवला जातो. दोन्हीची पद्धत जवळपास सारखीच असते. अशा पद्धतीने दही उपमा देखील बनवला जातो. या फक्त दही वापरले जाते जे उपम्याची चव आणखी वाढवते. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल.

दही उपमा

साहित्य:

  • १ कप रवा (रवा)
  • १ कप दही (दही)
  • १/२ कप पाणी
  • १/४ चमचा मीठ
  • १/४ चमचा जिरे
  • १ टेबलस्पून तूप किंवा तेल
  • तळलेले शेंगदाणे
  • डाळींबाचे दाणे
  • सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर पाने
  • पर्यायी: गाजर, वाटाणे किंवा कांदे यांसारख्या चिरलेल्या भाज्या

दही उपमा रेसिपी

प्रथम एका भांड्यात एक कप दही घ्या. त्यात, मिरची मीठ, कोथिंबीर टाकून चांगले हलवून घ्या आणि बाजूला ठेवा
आता एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी कडीपत्ता, लाल मिरची आणि पांढरी डाळ टाकून परतून घ्या.
आता त्यात कांदा, वाटाना, गाजर भाज्या टाकून चांगले परतून घ्या. त्यात रवा टाकून हलवून घ्या.
त्यानंतर तयार दह्याचे पाणी रव्यामध्ये टाका आणि हलवत राहा. गाठी पडणार नाही याची काळजी घ्या.
एका प्लेटमध्ये उपमा घ्या त्यावर सजावटी साठी कोथिंबीर, डाळींबाचे दाणेआणि तळलेले शेंगदाणे घाला.

Story img Loader