दररोज काय भाजी बनवायची? हा स्वयंपाक बनवणाऱ्याला पडणारा मोठा गहन प्रश्न असतो. मात्र कधीकधी आपल्या त्याच-त्याच भाज्या खाऊन खूप वैताग किंवा कंटाळा आलेला असतो. त्याऐवजी कधीतरी पिठलं किंवा उसळ हा पर्याय असतो. मात्र ऐनवेळी हे पदार्थ बनवायचे म्हण्टले कि नेमके यासाठी लागणारे साहित्य किंवा पूर्व तयारी म्हणजे टोमॅटो, मिरच्या, डाळ भिजत घालणे यांसारख्या गोष्टी उपलब्ध नसतात; त्यामुळे तो बेतदेखील रद्द केला जातो. मग बनवायचं तरी काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा प्रश्न इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @pawar_omkar या अकाउंटने शेअर केलेल्या रेसिपीमुळे अगदी सहज सोडवता येऊ शकतो. भाजीला पर्याय म्हणून तुम्ही मोजक्या गोष्टींचा वापर करून झटपट बनणारा दही तडका हा पदार्थ बनवू शकता. काय आहे याची सोपी आणि वेगळी रेसिपी पाहा.

हेही वाचा : Recipe : ब्रेड न वापरता बनवा पौष्टिक ‘व्हेज सँडविच’; काय आहे रेसिपी अन् प्रमाण पाहा…..

दही तडका कसा बनवावा?

साहित्य

तूप
कांदा
लसूण
दही
जिरे
लाल तिखट
हळद
मीठ
साखर
कोथिंबीर

कृती

सर्वप्रथमी एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालून घ्या.
तूप तापल्यानंतर यात जिरे, बारीक चिरलेला कांदा आणि लसूण पेस्ट/ किसलेले लसूण घालून घ्यावे. सर्व पदार्थ सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
नंतर यात हळद, लाल तिखट घालून पुन्हा सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करा.
आता गॅस बंद करून, यात फेटलेले दही घालुन घेऊन सर्व मिश्रण ढवळत राहा.
सगळे पदार्थ एकजीव झाल्यानंतर बारीक चारलेली कोथिंबीर, मीठ आणि साखर घालून घ्या. साखरेमुळे दह्याचा आंबटपणा कमी होण्यास मदत होते आणि चवदेखील वाढते.
तयार आहे तुमचा स्वादिष्ट आणि झटपट तयार होणार दही तडका. हा पदार्थ तुम्ही भात किंवा पोळी दोन्ही गोष्टींबरोबर खाऊ शकता.

@pawar_omkar या अकाउंटने शेअर केलेल्या या सोप्या रेसिपीला आतापर्यन्त १२३K इतके लाईक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you ever made this delicious dahi tadka recipe check out the simple and steps try it with rice or roti dha
Show comments