सकाळचा नाश्ता केल्यानंतर मधल्या वेळेत लागणारी भूक मिटवण्यासाठी काही जण चहा, कॉफी, फास्ट फूड किंवा एखाद्या पाकिटबंद खाद्यपदार्थाचे सेवन करतात. पण हा पर्याय आरोग्यासाठी पौष्टिक नाही. याऐवजी तुम्ही घरच्या घरी हेल्दी सूप तयार करून पिऊ शकता. कमीत कमी वेळात तयार होणाऱ्या सूप रेसिपीची माहिती आपण पाहणार आहोत. अतिसाराचा त्रास किंवा आजारी असताना डॉक्टर देखील आपल्याला सूप पिण्याचा सल्ला देतात.चला तर पाहुयात हे गोल्डन सूप कसे तयार करायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोल्डन सूप साहित्य –

  • २ मोठे टोमॅटो चिरलेले, १ बारीक कांदा चिरून
  • १ मध्यम आकाराचे गाजर चिरून, २ लवंगा
  • २ मिरी दाणे, १ छोटा तुकडा दालचिनी
  • चवीनुसार मीठ आणि साखर, बटर

गोल्डन सूप कृती –

प्रेशर कुकरमध्ये बटर वितळवून घ्या, त्यात लवंग, मिऱ्या, दालचिनी टाका. त्यानंतर चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परता. यामध्ये गाजराचे तुकडे घालून पुन्हा मिनिटे परता. नंतर चिरलेला टोमॅटो घालून मिश्रणाला एक वाफ आणा. चवीनुसार मीठ आणि साखर घालून दीड कप पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यावर झाकण लावून २ शिट्या झाल्यावर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ब्लेण्ड करा. नंतर काढईत ओतून आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी आणा. अशा प्रकारे आपले गोल्डन सूप तयार आहे.

हेही वाचा – रताळ्याचा कीस! आषाढी एकादशी व्रत करणार्‍यांसाठी खास उपवास स्पेशल रेसिपी!

गरम सूप ब्रेड क्रुटोनबरोबर खायला देऊ शकता.