– डॉ. सारिका सातव
साहित्य :
* मक्याचे दाणे- एक ते दीड वाटी
* बारीक चिरलेला कांदा- अर्धा वाटी
* बारीक चिरलेला टोमॅटो- अर्धा वाटी
* मीठ चवीपुरते ल्ल लाल तिखट-पाव चमचा
* चाट मसाला- एक चमचा,
* लिंबू रस-दोन चमचे
* बारीक चिरलेली कोथंबीर- अर्धा वाटी
* बारीक शेव- दोन मोठे चमचे
कृती :
* मक्याचे दाणे थोडे मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
* शिजलेले दाणे चाळणीत घेऊन पाणी पूर्ण निथळून घ्यावे.
* शेव व कोथंबीर सोडून सर्व सामग्री या दाण्यांमध्ये मिसळून चांगले एकत्र करावे.
* एका ताटात हे मिश्रण काढून वरून कोथंबीर व शेव टाकून खाण्यास द्यावे.
वैशिष्टय़े :
* पावसाळय़ात खाण्यासाठी उत्तम पदार्थ.
* चवीस उत्तम
* लहान मुलांना विशेष आवडणारा. इतर भाज्या त्यात टाकू शकतो.
* मधुमेह, स्थूलपणा असणाऱ्यांनी मोड आलेले मूग यात मिसळून खाल्ल्यास उत्तम.