winter healthy ladoo recipe : सुंठ आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. सुंठात काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी रोज सुंठाच्या लाडूचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अनेक महिलांना डिलिव्हरीनंतर हे लाडू दिले जातात. हे लाडू खाल्ल्याने शरीरास ताकद मिळते. ज्यामुळे हिवाळ्यातील विविध आजारांपासून दूर राहता येते. त्यामुळे आज आपण पौष्टिक सुंठाचे लाडू कसे बनवले जातात, याची रेपिसी जाणून घेणार आहोत.

सुंठाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१) सुंठ – २५ ग्रॅम
२) देशी तूप – १२५ ग्रॅम
३) बदाम – ३५ ग्रॅम
४) डिंक – ५० ग्रॅम
५) पिस्ता काप केलेले – १२
६) गूळ – २५० ग्रॅम
७) सुके खोबरे किसलेले – १ वाटी

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
How to make Methi Kadhi marathi Methi Kadhi recipe marathi Methi Kadhi recipe
थंडीत वाफाळत्या भातासोबत खा पौष्टिक ‘ मेथीची कढी’! खास रेसिपी
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Nutritious ladoo of cashews and almonds
सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी

हेही वाचा -जगातील सर्वात वाईट पदार्थ्यांच्या यादीत भारतातील ‘या’ भाजीचा समावेश; तुम्हाला आवडते का ही भाजी?

सुंठाचे लाडू बनवण्याची कृती

सुंठाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम डिंकाचे बारीक तुकडे करा, यानंतर एका कढईत तूप गरम करून त्यात डिंकाचे तुकडे टाकून नीट तळून घ्या. डिंक फुगून मोठा झाला की एका ताटात काढा. यानंतर उरलेल्या तुपात गव्हाचे पीठ घाला आणि चमच्याने सतत ढवळत राहा, पीठ हलके सोनेरी तपकिरी झाल्यानंतर एका कोरड्या ताटात काढा. यानंतर पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या. तसेच बदाम मिक्सरमध्ये टाकून बारीक पेस्ट बनवा.

आता कढईत पुन्हा थोडे तूप गरम करा आणि त्यात सुंठ पावडर टाकून एक ते दीड मिनिटे परतून घ्या. आता ते एका प्लेटमध्ये काढा. डिंक चांगल्याप्रकारे थंड झाल्यानंतर तो कुस्करून घ्या. आता कढई मंद आचेवर ठेवा आणि त्यात बारीक केलेला गूळ टाका. गूळ चांगल्याप्रकारे वितळल्यानंतर गॅस बंद करा. आता वितळलेल्या गुळाच्या पाकात भाजलेले गव्हाचे पीठ, सुंठ, डिंक, बदाम पावडर, नारळ आणि पिस्ता घालून चमच्याने चांगले मिक्स करा.

गॅसवरून कढई खाली उतरवा. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर तळहाताला थोडे पाणी लावून लाडू वळायला घ्या. लाडू बनवून तयार झाले की काही वेळ हवेत बाहेर राहू द्या, जेणेकरून ते चांगले घट्ट होतील. अशाप्रकारे तुमचे पौष्टिक सुंठाचे लाडू तयार आहेत.

Story img Loader