कडधान्ये खाण्यास तरुण मंडळी नेहमीच कंटाळा करतात. पण, कडधान्ये आहारात असावे असा सल्ला आपल्याला डॉक्टरांकडून तर घरातील मोठ्यांकडूनही नेहमीच मिळतो. कडधान्यांमध्ये अनेक प्रकार असतात. त्यात जास्त तर मूग डाळीचा वापर घरगुती पदार्थांमध्ये करण्यात येतो. तर आज आपण मूग डाळीपासून तयार करण्यात आलेला एक खास पदार्थ पाहणार आहोत. सोशल मीडियावर एका युजरने हा खास पदार्थ बनवून दाखवला आहे ; ज्याचे नाव युजरने ‘मुगाच्या डाळीचे मुंगलेट’ असे ठेवले आहे. चला तर पाहुयात या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य –

season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
Art and Culture with Devdutt Pattanaik | What sculptures tell us about Indian culture
UPSC Essentials:हडप्पा ते चोल कालखंड: भारतीय शिल्पकृती इतिहास कसा उलगडतात?| देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती
histrionic personality disorder
स्वभाव – विभाव : लक्ष वेधून घेण्याची धडपड
Loksatta kutuhal Types of large language formats
कुतूहल: विशाल भाषा प्रारूपांचे प्रकार
Bird Sanctuary Tourism marathi news
सफरनामा: किलबिलाट भटकंती
chaturang nature disorder harmful to society Personality American Psychological Association
स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार

१. मूग डाळ
२. कांदा
३. किसलेला गाजर
४. कोथिंबीर
५. मिरची
६. जिरे
७. मीठ
८. इनो
९. बटर

हेही वाचा…१५ मिनिटांत कपभर गूळ, शेंगदाण्याचा बनवा पौष्टीक लाडू; मोजकं साहित्य अन् कृती लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

१. भिजवलेली मूग डाळ मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्या.
२. नंतर त्या मिश्रणात कांदा, गाजर, कोथिंबीर मिरची, जिरे, मीठ घाला.
३. त्यानंतर मिश्रण एकजीव करून घ्या. एक चमचा इनो सुद्धा त्या मिश्रणात घाला.
४. पॅनवर बटर पसरवून घ्या.
५. चमच्याच्या साहाय्याने मिश्रण तव्यावर पसरवून घ्या व वरून बिट आणि गाजर किसून घाला.
६. नंतर त्यावर झाकण ठेवा आणि थोडा वेळ तसंच राहू द्या.
७. त्यानंतर तव्यावरच त्याचे पिझ्झाप्रमाणे चार भाग करून घ्या. आवडीनुसार त्यावर बटर लावा.
८. आणि गरमागरम प्लेटमध्ये सर्व्ह करा.

मूग डाळीचे आरोग्यदायी फायदे –

पिवळी डाळ किंवा मूग डाळ ही अत्यंत पौष्टिक असते. तसेच स्वयंपाकघरात याचा सर्वाधिक वापर केला जातो. मूग डाळीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, जी रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी मूग डाळ ही एक चांगली निवड आहे. मूग डाळ वनस्पती-आधारित प्रथिने आणि आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच मूग डाळ पचनाससुद्धा मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करते. मूग डाळीतील जीवनसत्व आणि फोलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी ६ पौष्टिकदृष्ट्या महत्वाचे असतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @me_haay_foodie यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे अकाउंट डिजिटल क्रिएटर अभिषेक आणि दीपाली यांचे आहे ; जे नवनवीन पदार्थांचे व्हिडीओ युजर्ससाठी घेऊन येत असतात. तुम्ही सुद्धा मूग डाळीपासून बनवलेला हा पदार्थ झटपट बनवू शकता आणि घरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला देऊ शकता.