Chun Vadi recipe in marathi गावाकडे केल्या जाणाऱ्या पदार्थांची चव हल्ली चाखायला मिळत नाही. पूर्वीच्या भाजांमध्ये वाटणस वेगवेगळे मसाले अशी कोणतीच पद्धत नव्हती, तरीही पदार्थ अगदी चवदार लागायचे. हल्ली वेगवेगळे मसाले वापरुनही ती चव येत नाही. दरम्यान आम्ही तुमच्यासाठी असाच एक पारंपारिक पदार्थ आणला आहे. चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत कशी बनवायची झणझणीत चुनवडी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चुनवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • २~३ लसूण पाकळ्या
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • १ कप बेसन
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/४ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • १/४ कप पाणी
  • २ चमचे तेल
  • १/४ चमचा हिंग
  • बारीक चिरलेला कांदा
  • १ बारीक चिरलेला टोमॅटो
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • सुकं किसलेलं खोबरं
  • १ चमचा संडे मसाला
  • १/२ चमचा लाल तिखट
  • गरम पाणी
  • चवीनुसार मीठ

चुनवडी बनवण्यासाठी कृती

  • स्टेप १
    सर्वप्रथम बेसनामध्ये तिखट, मीठ, हळद,तेल, ओवा व थोडे थोडे पाणी घालून,बेसन मळून घ्या. व त्याचा घट्टसर गोळा भिजवून बाजूला ठेवून द्या.
  • स्टेप २
    भिजवलेल्या बेसनाची पोळपाटावर जाडसर पोळी लाटून घ्या व त्याचे चौकोनी काप करून घ्या. (फोटोत दाखवीले तसे)
  • स्टेप ३
    मिक्सरच्या पॉटमध्ये भिजवून घेतलेल्या बेसनाचा अगदी थोडासा गोळा घेऊन, त्यात थोडे पाणी घालून फीरवून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट आपल्याला रस्सा तयार करताना वापरायची आहे. (या पेस्ट मुळे रस्सा घट्ट होतो. दुसरा मसाला लावायची गरज पडत नाही)
  • स्टेप ४
    एक पॅन घ्या. त्यामध्ये तेल घाला. तेल चांगले गरम झाले की, मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये, कांदा, लसूण पेस्ट, टमाटर, कढीपत्ता, हिंग घालून एक मिनिट परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये तिखट, धने पावडर, जीरे पावडर, हळद व तयार केलेली जी पेस्ट आहे ती घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
  • स्टेप ५
    एक ते दीड ग्लास पाणी घालून पाण्याला उकळी येऊ द्या. उकळी आली की त्यात काप केलेल्या वड्या घाला व पाच ते सात मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्या.

हेही वाचा >> जेवताना तोंडी लावण्यासाठी करा “लसणाच्या पातीचा ठेचा”, आजारपणातही येईल तोंडाला चव

  • स्टेप ६
    रस्साच्या वरती वडया आल्या की, आपल्या वड्या शिजल्या असे समजावे. वरून गरम मसाला व कोथिंबीर घालून गरमागरम चपाती सोबत सर्व्ह करावी पातोडी किंवा चुनवडी
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy recipe chun vadi dubuk vadyanchi aamti recipe in marathi srk
Show comments