जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “झणझणीत गावरान झिरकं”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत गावरान झिरकं..
झिरकं बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- १/४ कप कच्चे शेंगदाणे
- १ चमचा किसलेलं सुकं खोबरं
- १/२ चमचा पांढरे तीळ
- १०~१२ लसूण पाकळ्या
- ५~६ हिरव्या मिरच्या
- भरपूर कोथिंबीर
- १ चमचा तेल
- १/२ चमचा मोहरी
- १/२ चमचा जिरं
- चिमूटभर हिंग
- कढीपत्ता
- १/४ चमचा हळद
- पाणी
- चवीनुसार मीठ
झिरकं बनवण्यासाठी कृती –
- सर्वप्रथम शेंगदाणे, किसलेलं सुकं खोबरं, पांढरे तीळ, मिरची, लसूण, कडीपत्ता व जिरे एकत्रित वाटून घेणे.
- तेलात जिरे व मोहरी, चिमुटभ हिंग हळदीची फोडणी करून कांदा व वाटण घालून परतणे.
- पाणी घालून उकळी आणणे व शिजवणे.
- आवडीप्रमाणे दाट किंवा पातळ ठेवणे.
हेही वाचा >> फणसाची भाजी; बोटं चाटून पुसून खाल जेव्हा ‘या’ पद्धतीने फणसाची भाजी बनवून बघाल
- भाकरीसोबत झिरकं खाण्यास तयार.