उष्णतेचा पारा दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहे. वाढत्या तापमानामुळे लोक निर्जलीकरणास बळी पडत आहे. अशा परिस्थितीत शरीरातील पाण्याची पातळी टिकवणे फार महत्वाचे आहे. पण उन्हाळ्यात रोज तुम्हाला लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक पिण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही लिचीचा ज्यूस नक्की ट्राय करु शकता. हा ज्यूस तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासह त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. व्हिटॅमिन सीने समृद्ध हे फळ पचनक्रिया सुधारते तसेच ह्रदय व रक्तवाहिन्यांशीसंबधीत आरोग्य सुधारते. याशिवाय लठ्ठपणावरही ते गुणकारी मानले जाते. त्यामुळे लिचीचा ज्यूस घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊ….
नाचणी-तांदळाची भाकरी नेहमीच खातो, खाऊन पाहा ज्वारीची ‘मसाला भाकरी’; ही घ्या सोपी रेसिपी
लिची ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य
अर्धा किलो लिची, बर्फाचे तुकडे, १ लिंबाचा रस, दीड ग्लास पाणी, चवीनुसार साखर
लिची ज्यूस बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका भांड्यात अर्धा किलो ताजी लीची घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर लिचीची साल काढून एका प्लेटमध्ये ठेवा. आता सुरीने लिचीच्या आतील बिया काढून टाका, लिचीच्या बिया काढल्यानंतर तिचे लहान तुकडे करा. आता चिरलेला लिचीचा तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाका. ज्यूसमधील पाण्याचे प्रमाण लिचीच्या प्रमाणात अवलंबून असते. जर तुम्ही अर्धा किलो लिची घेतली असेल तर त्यात दीड ग्लास पाणी टाका.
अशाप्रकारे लिची मिक्सरमध्ये खूप बारीक वाटून घ्या. जर तुम्ही हा ज्यूस ज्युसरमध्ये तयार केला असेल तर तो गाळून घेण्याची गरज नाही. पण जर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राउंड केले असेल तर ते गाळून नंतरच प्या. जर लिची व्यवस्थित ग्राउंड झाली नसेल तर ग्राइंडर पुन्हा एकदा फिरवा.
आता एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि नंतर लिचीचा ज्यूस त्यात ओता. चवीसाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस आणि थोडी साखर देखील घालू शकता. अशाप्रकारे तुमचा चविष्ट लिची ज्यूस पिण्यासाठी तयार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd