होळी सणाची आतुरता प्रत्येकाला लागली आहे. होळी म्हटलं की पहिल्यांदा आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची. होळी रे होळी, पुरणाची पोळी…असे म्हणत पुरणपोळीवर ताव मारणाऱ्यांसाठी होळीचा दिवस खास असतो. खमंग, लुसलुशीत पुरणपोळ्या खायला अनेकांना आवडतात. पण या बनवायच्या म्हटलं की अनेक गृहिणींच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात. पुरणपोळी बनवताना डाळ नीट शिजेल ना, मैद्याचे पीठ नीट होईल नाही, सारण बाहेर येईल का? पुरण नीट होईल ना, असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. पण पण आज आम्ही तुम्हाला परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला पुरण परफेक्ट कसे बनवता येईल याबद्दल देखील काही टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
- १ कप चणा डाळ
- १ कप किसलेला गूळ
- एक कप मैदा
- ७ ते ८ टेबलस्पून तेल
- १ चमचा वेलची पूड
- मैदा
( हे ही वाचा: उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी घरच्याघरी बनवा ‘आंबा सरबत’, जाणून घ्या सोपी रेसिपी)
कृती
- सर्वात आधी कुकर घ्यावा आणि त्यामध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी काढून घ्यावे.
- यानंतर डाळ एका भांड्यात घ्यावी. त्यामध्ये किसलेला गूळ घालावा. त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. ते आटवताना वरचेवर हे मिश्रण चांगले ढवळत रहा. यावेळी हे मिश्रण चांगले ढवळले गेले नाही, तर ते करपू शकते. यासोबत यात वेलची पूड घालावी.
- यानंतर हे मिश्रण घट्ट झाले की गॅसवरून उतरवावे. एक गोष्ट लक्षात घ्या की, मिश्रण गरम असताना पुरण यंत्रातून फिरवून घेणे गरजेचे आहे. मिश्रण थंड झाले की ते नीट वाटले जात नाही.
- यानंतर मैदा घ्यावा आणि त्यात ५ ते ६ चमचे तेल आणि थोडीशी हळद मिसळावी. नंतर हे पीठ मळून घ्यावे. हे पीठ २ तास ठेवून द्या.
- यानंतर पुरणाच्या मिश्रणाचे दीड इंचाचे गोळे बनवून घ्या. तर मैद्याच्या पीठाचे अर्धा ते एक इंचाचा गोळा तयार करा. त्यांनंतर त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
- पोळी भाजताना नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर भाजावी. पुरणपोळी चांगली सोनेरी भाजली की भांड्यात न ठेवता कागदावर ठेवावी.
First published on: 02-03-2023 at 18:27 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi special how to make restaurant style puran poli recipe know simple tips gps