Home Made Maggy Recipe In Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून, तर कधी रात्री २ वाजता भूक लागते म्हणून दोन मिनिटांत झटपट होणारी मॅगी खायला सर्वांनाच आवडते. मॅगीनंतरही अनेक ब्रॅण्ड्स बाजारात आले; पण मॅगी ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती ठरली. सोशल मीडियावरही मॅगीशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल असतात, ज्यात अगदी वेगवेगळ्या प्रकारे मॅगी बनवली जाते. पण, आई नेहमीच मॅगी खाण्यापासून आपल्याला थांबवत असते. जर तुम्हाला मॅगी खायची असेल, पण बाहेरचे पदार्थ खायला आई नकार देत असेल. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा मॅगी बनवू शकता (Home Made Maggy). ते कसं? तर आज आपण घरगुती पद्धतीने गव्हाच्या पिठापासून बनवली पौष्टीक मॅगी बनवणार आहोत.

गव्हाच्या पिठापासून मॅगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Home Made Maggi Ingredients) :

१. एक वाटी पिठ
२. मिठ
३. मॅगी मसाल
४. आवडीनुसार कांदा, टोमॅटो किंवा इतर भाज्यासुद्धा घालू शकता.

हेही वाचा…Winter Special laddoo : पाव किलो हरभरा, गुळापासून हिवाळ्यात बनवा पौष्टिक लाडू; २० मिनिटांत होणारी झटपट रेसिपी नक्की ट्राय करा

गव्हाच्या पिठापासून मॅगी बनवण्यासाठी लागणारं कृती (How To Make Home Made Maggi ) :

१. एक वाटी पिठ घ्या.
२. त्यात मीठ घाला आणखी मळून घ्या. पीठ मळताना एक चमचा तेल घाला आणि घट्ट मळून घ्या.
३. दोन वाटी पाणी गरम करायला ठेवा.
४. शेवाच्या साच्यात पीठ घाला आणि नूडल्स पाण्यात गाळा.
५. नंतर त्यात मॅगी मसाला टाका.
६. शिजल्यानंतर गॅस बंद करा.
७. अशाप्रकारे तुम्ही गव्हाच्या पिठापासून मॅगी तयार (Home Made Maggy).

गव्हाच्या पिठाचे आरोग्यदायी फायदे :

भारतीय लोक स्वयंपाकघरांमध्ये अनेक पदार्थ बनवण्यासाठी सर्वात जास्त गव्हाच्या पीठाचा वापर करतात. १०० ग्रॅम गव्हाच्या पीठामध्ये ३४० ते ३५० ग्रॅम कॅलरीज दिसून येतात. यामध्ये ७१ ग्रॅम कर्बोदके, १२-१३ ग्रॅम प्रोटिन्स आणि दोन ग्रॅम फॅट असते. विशेष म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये रव्यापेक्षा जास्त फायबर असतात. १०० ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये १२ – १३ ग्रॅम फायबर असतात. गव्हामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते. तर गव्हाचे पीठ आपण सहसा पोळी, रोटी, पराठा, पुरी बनवण्यासाठी वापरतो. पण, आता तुम्ही गव्हाच्या पिठापासून मॅगी (Home Made Maggy ) बनवून पाहा आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला द्या.