लोहाचे प्रमाण अधिक असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहतेच; त्याचसोबत तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळीत वाढ होऊन, त्यास उत्साही राहण्यास मदत होते. हिवाळ्यात थंडीमुळे जर शरीर आळसावले असेल किंवा तुम्हाला सुस्त वाटत असल्यास या पाच रेसिपी नक्कीच तुम्हाला मदत करू शकतात. लोह हे एक असे खनिज आहे, जे तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. हिमोग्लोबिन म्हणजेच तुमच्या रक्तातील आढळणारा असा घटक, जो शरीरातील प्रत्येक भागाला प्राणवायू/ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिरव्या पालेभाज्या, डाळी, सुकामेवा आणि शेंगा यांसारख्या पदार्थांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असून, हिवाळ्यात त्यांचा चांगला उपयोग होतो. थकवा, डोकेदुखी, चिडचिड ही शरीरात लोहाचे प्रमाण कमी असण्याची काही लक्षणं आहेत. अश्या प्रकारच्या गोष्टी जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन त्यावर उपचार करावे.

आता हिवाळ्यात घरगुती पदार्थांनी शरीरातील लोहाचे प्रमाण कसे वाढवू शकतो, याबद्दल आहारतज्ज्ञ डॉक्टर निकिता कोहली [Nutritionist Dr Nitika Kohli] यांनी काही पदार्थ आणि त्याच्या रेसिपी सुचवल्या आहेत. हे पाच घरगुती पदार्थ कोणते आहेत व त्यांच्या अतिशय सोप्या अशा रेसिपी कोणत्या आहेत ते पाहा.

हेही वाचा : Recipe : वरणाला द्या राजस्थानी तडका; झटपट तयार होणाऱ्या आंबट-गोड डाळीची रेसिपी पाहा….

शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवणारे पदार्थ आणि रेसिपी :

१. डाळ-पालक

साहित्य

तूर डाळ
पालक
जिरे
आले
लसूण
हिरवी मिरची
हळद मीठ
तूप

कृती

सर्वप्रथम तूर डाळ थोडी हळद घालून नेहमीप्रमाणे शिजवून घ्यावी.
एका पॅनमध्ये किंवा एखाद्या पातेल्यात तुपाची फोडणी करून घ्यावी. यासाठी पातेल्यात तूप तापवून त्यामध्ये बारीक केलेलं आलं-लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात.
त्यानंतर पालकाची स्वच्छ धुवून घेतलेली पाने टाकून ती संपूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावीत. आता यात शिजवलेली तूर डाळ घालून त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ व्यवस्थित शिजवून घ्या.
तयार आहे, लोहयुक्त डाळ-पालक.

२. बीट-गाजर सॅलेड

साहित्य

किसलेले गाजर
किसलेले बीट
लिंबाचा रस
कोथिंबीर
काळे/सेंधव मीठ
जिरे पावडर
मिरपूड

कृती

किसलेले बीट व गाजर एकत्र करून त्यामध्ये लिंबाचा रस, काळे मीठ, जिरे पूड घालून मिश्रण ढवळून घ्या.
आता तयार सॅलेडवर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

हेही वाचा : प्रेशर कुकरमध्ये झटपट बेक करा केक; घरी केक बनवण्यासाठी पाहा या टिप्स…

३. नाचणीची खीर

साहित्य

नाचणीचे पीठ
पाणी
दूध
गूळ
वेलची पावडर

कृती

नाचणीचे पीठ थोडे घट्टसर होईपर्यंत त्यात पाणी घालून ढवळून घ्यावे.
त्यामध्ये दूध, गूळ आणि वेलची पूड घालून मिश्रण शिजवत ठेवावे.
नाचणीची खीर तुम्हाला हवी तितकी घट्ट किंवा पातळ करून घ्या.

४. डाळिंब आणि खजुराची चटणी

साहित्य

डाळिंबाचे दाणे
खजूर
जिरे पूड
मीठ
लाल तिखट

कृती

डाळिंबाचे दाणे आणि बिया काढून घेतलेल्या खजुराचा गर मिक्सरला लावून त्यांची पेस्ट तयार करा.
त्यामध्ये मीठ, जिरेपूड आणि लाल तिखट घालून घेऊन मिश्रण व्यवस्थित ढवळावे.
तयार आहे, डाळिंब आणि खजुराची चटणी.

५. काळ्या तिळाचे लाडू

साहित्य

काळे तीळ
गूळ किंवा खजुराची पेस्ट
शुद्ध तूप

कृती

काळे तीळ मिक्सरला लावून, तिळाची बारीक पूड करून घ्यावी.
ही तिळाची पूड शुद्ध तूप आणि गूळ किंवा खजुराच्या पेस्टमध्ये टाकून या सर्वांचे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे.
घट्ट तयार झालेल्या या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत. तयार आहेत, काळ्या तिळाचे पौष्टिक लाडू.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homemade food that will boost iron levels in winter season here are five easy to make recipes dha